शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

Ajit Pawar Live: 'ओमायक्रॉनचा संसर्ग जोरात सुरू; पुणे शहरात आज 1 हजार 104 रुग्ण'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 6:35 PM

या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे

पुणे: मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्शभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात तातडीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदे घेतली. या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे-

-दोन डोस घेतले तर कोरोनाचा धोका कमी असतो, त्यामुळे पुणेकरांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घ्यावेत.

- आज पुणे शहरात 1 हजार 104 कोरोनाचे नवे रुग्ण.

- पुणे जिल्ह्यातील 8 वी पर्यंतच्या शाळा बंद राहतील.

- नववी ते दहावीचे वर्ग सुरू राहतील, कारण या वयोगटातील मुलांना लस द्यायची आहे.

-ओमायक्रॉंनचा संसर्ग जोरात सुरू  आहे. आगामी 40 ते 45 दिवसात याचा विस्फोट होण्याची शक्यता आहे. जगातील 105 देशात याचा  संसर्ग झाला आहे.

-आता ओमायक्रॉन भारतातही पसरत आहे. जगातील इतर देशात सुरवातीला ओमायक्रॉनचा धोका वाढला आहे.

-रंगीबेरंगी, कापडी किंवा सर्जिकल मास्क वापरण्याऐवजी थ्री लेअर किंवा N95 मास्क वापरावे. साधे मास्क सुरक्षित नाहीत.

- उद्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यासाठी नियमावली लागू करावी यासंबंधी ऑर्डर काढली जाईल.

- पुण्यात उद्यापासून मास्क नसेल तर 500 रुपये दंड, आणि मास्क नसताना एखादा व्यक्ती थुंकला तर 1000 रुपये दंड आकाराला जाईल.

-लशीचे दोन्ही डोस घेतले तरच आता सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जाईल. यापूर्वीही अनेकदा याचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले होते. परंतु आजवर याचे पालन झाले नाही. आता मात्र याची अंमलबजावणी केली जाईल.

- 10 जानेवारीपासून 60 वर्षावरील  व्यक्तीला बूस्टर डोस दिला जाईल. फिल्डवर काम करणाऱ्या व्यक्तीला देखील बूस्टर डोस दिला जाणार आहे.

- हॉटेल, बार, शासकीय आणि खासगी आस्थापनामध्ये लशीचे दोन्ही डोस घेतले असतील तरच प्रवेश दिला जाईल. घेतले नसतील तर अशा व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. याची सक्त अंमलबजावणी केली जाईल. 

- ही नियमावली पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी लागू असेल.

-या सर्व नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस