तीन सदस्यीय प्रभाग रचनेवर अजित पवार काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 01:39 PM2021-10-01T13:39:50+5:302021-10-01T14:00:47+5:30
सोशल डिस्टंस आणि गर्दी टाळण्याचं आवाहन अजित पवारांनी केलं आहे
पुणे: मागील काही दिवसांपासून राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेवरून सरकारमधील तीन पक्षात वाद दिसला होता. अखेर तीन सदस्यीय प्रभाग रचना येणाऱ्या निवडणुकांत असणार आहे. आज पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांनी (ajit pawar) प्रभाग रचनेबद्दल वक्तव्य केले आहे. आतापर्यंत 2 प्रभाग रचनेवर भर देणाऱ्या अजित पवारांनी तीन सदस्यीय प्रभाग रचनेच्या मुद्द्याला समर्थन दिले आहे. तसेच आगामी निवडणुकांत तीन सदस्यीय प्रभाग रचना असल्याचं स्पष्ट केलं आहे.
पुण्यात सलग 75 तास लसीकरण मोहीम- अजित पवार
अजित पवारांच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे-
-लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांकडून नियमांचं सर्रास उल्लंघन होत आहे.
-सीएसआर फडातून 5 लाख लशींचे डोस उपलब्ध.
-दोन्ही डोस घेतलेल्यांनी काळजी घ्यावी.
-सध्या सिरिंजचा तुटवडा जाणवत आहे.
- सर्वांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टंस आणि गर्दी टाळण्याचं आवाहन.
- पुण्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात सलग 75 तास लसीकरण कार्यक्रम.
- गर्दी टाळण्याचे पालकमंत्री पवारांकडून आवाहन.
- ससूनमध्ये 40 टक्के कोरोना रुग्ण नगरचे.
- लस घेतल्यावरही मास्क गरजेचा आहे