'लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका'- अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 11:33 AM2021-09-24T11:33:21+5:302021-09-24T14:02:37+5:30
पुणे: 'लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका', असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी पुणे येथे दिला. आज पुण्यात ...
पुणे: 'लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका', असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी पुणे येथे दिला. आज पुण्यात उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी, बोलताना पवार पुढे म्हणाले, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करू, पण ज्यावेळी निवडणुका संपतात त्यावेळी जनतेनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी विकासकामांवर भर दिला पाहिजे. आजच्या भूमिपूजन सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते.
'सध्या केंद्र, राज्य आणि मनपा या तिन्ही यंत्रनांणी समन्वय ठेवूऩ कामं लवकर पूर्ण केली पाहिजेत. राज्याच्या विकासकामांत नितीन गडकरींचे भरीव असं योगदान असतं. विकासकामांसाठी राज्य सरकार नेहमी केंद्रासोबत असेल आणि सर्वांनी एकत्र समन्वय साधून काम केल्यास पुणे शहराचा विकास वेगाने होईल, अशी आशाही पवार यांनी व्यक्त केली.
आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात 221 किलोमीटर लांबीच्या 22 महामार्ग प्रकल्पांचा नारळ गडकरींच्या हस्ते आज शुक्रवारी (दि. 24) फोडला गेला. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल 134 कोटीं रुपयांची रस्ते, पुलांची कामे करण्यात येणार आहेत.