संमेलनाला न जाण्याचे अजित पवारांचे ‘नाट्य’; आयोजक म्हणतात, भेटून निमंत्रण दिले होते

By श्रीकिशन काळे | Published: January 5, 2024 01:48 PM2024-01-05T13:48:40+5:302024-01-05T13:50:51+5:30

नाट्य संमेलनाच्या आयोजकांनी अजित पवारांना भेटून निमंत्रण पत्रिका दिली हाेती, तरी अजितदादांनी निमंत्रण नसल्याचे सांगितले

Ajit Pawar of not going to the natya samelan Organizers say meet and invite ajit pawar | संमेलनाला न जाण्याचे अजित पवारांचे ‘नाट्य’; आयोजक म्हणतात, भेटून निमंत्रण दिले होते

संमेलनाला न जाण्याचे अजित पवारांचे ‘नाट्य’; आयोजक म्हणतात, भेटून निमंत्रण दिले होते

पुणे : शंभराव्या मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभाच्या उद‌्घाटनाला ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांना निमंत्रण दिले आहे. निमंत्रण पत्रिकेत दोघांची नावे आहेत. परंतु, अजित पवार यांनी मात्र आपल्याला निमंत्रण नसल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले आणि कोणीही कशावरही नाव टाकतं असाही टोला लगावला. दुसरीकडे संमेलनाच्या आयोजकांनी अजित पवारांना भेटून निमंत्रण पत्रिका दिली हाेती, असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे नाट्य संमेलनावरून चांगलेच राजकीय ‘नाट्य’ रंगले आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदच्या संमेलनाचा शुभारंभ सोहळा आज (दि.५) सायंकाळी ५ वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची नावे निमंत्रण पत्रिकेत दिली आहेत. परंतु, आज अजित पवार यांना एका कार्यक्रमानंतर नाट्य संमेलनाला जाणार का ? असे प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी विचारले. तेव्हा ते म्हणाले, उद‌्घाटन नाही, पडद्याचे काही तरी आहे. निमंत्रण नाही. कसंय माझे नाव कुठंही टाकतात.’’ यावरून नाट्यसंमेलनाला ते जाणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान याविषयी संमेलनाचे आयोजक मेघराज राजेभोसले यांनी मात्र अजित पवार आणि उदय सामंत यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण दिले होते. तरी देखील अजित पवार यांनी याविषयी माहिती नसल्याचे सांगून संमेलनाला जाण्याचे टाळले. खरंतर या संमेलनाच्या व्यासपीठावर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील, अशी चर्चा होती. पण अजित पवारांनी संमेलनाच्या शुभारंभाकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: Ajit Pawar of not going to the natya samelan Organizers say meet and invite ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.