Barsu Project | "बारसु प्रकल्पाला आमचा विरोध नाही पण..." अजित पवारांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 02:28 PM2023-04-29T14:28:53+5:302023-04-29T14:34:10+5:30

सर्व बाबींचा विचार करून संवेदनशील मार्गाने तसेच सर्वांशी चर्चा करून सरकारने यातून मार्ग काढावा...

Ajit Pawar said should discuss the Barsu project with everyone and find a way | Barsu Project | "बारसु प्रकल्पाला आमचा विरोध नाही पण..." अजित पवारांची प्रतिक्रिया

Barsu Project | "बारसु प्रकल्पाला आमचा विरोध नाही पण..." अजित पवारांची प्रतिक्रिया

googlenewsNext

बारामती (पुणे) : बारसु प्रकल्पाबाबत विकास कामांबद्दल आमचा कधीही विरोध नाही. मात्र हा विकास करत असताना पर्यावरणाचा -हास होणार नाही. त्या भागातील निसर्ग सौंदर्य अडचणीत येणार नाही. तसेच मासेमारी करणारे अडचणीत येणार नाहीत, या सर्व बाबींचा विचार करून संवेदनशील मार्गाने तसेच सर्वांशी चर्चा करून सरकारने यातून मार्ग काढावा, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

बारामती येथे पत्रकारांशी बोलताना पवार यांनी बारसु येथील प्रकल्पाबाबत चर्चा करुन मार्ग काढण्याची गरज व्यक्त केली. बारामती बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवित सत्ता कायम राखली आहे. या विजयाबाबत पवार यांनी हा विजय हा कामाची पोहचपावती असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शखाली आम्ही उत्तम पद्धतीने काम करत आहोत. पुन्हा एकदा या कामाची पोहोचपावती मिळालेली आहे. यामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. ही जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडू, असे मत पवार यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Ajit Pawar said should discuss the Barsu project with everyone and find a way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.