सरकारचा दरारा नाही, काय वाटेल ते सुरू आहे- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 10:04 AM2022-11-15T10:04:21+5:302022-11-15T10:05:28+5:30

पवार म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या दडपशाहीला कंटाळून राजीनामा देत असल्याचे ट्वीट केले. त्यांनी असे करू नये म्हणून त्यांना सांगणार आहे...

ajit pawar said There is no crack from the government, whatever you think is going on | सरकारचा दरारा नाही, काय वाटेल ते सुरू आहे- अजित पवार

सरकारचा दरारा नाही, काय वाटेल ते सुरू आहे- अजित पवार

googlenewsNext

पुणे : राज्यात सरकारचा दरारा राहिलेला नाही. बैलगाड्यांच्या शर्यतींत गोळीबार होतो. कोणीही काहीही गलिच्छ बोलतात. जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन-दोन वेळा गुन्हे दाखल होतात. हे सगळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे चिन्ह असून, राज्याला ते परवडणारे नाही, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते सोमवारी सकाळी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झाले. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेही उपस्थित होते. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोघांचेही स्वागत केले.

पवार म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या दडपशाहीला कंटाळून राजीनामा देत असल्याचे ट्वीट केले. त्यांनी असे करू नये म्हणून त्यांना सांगणार आहे. राजकारणात चढ-उतार येत असतात. आरोप होतात, टीका होते, त्याचा अर्थ ते सगळं खरं असतंच असं नाही. खुद्द पवार साहेबांवर कितीतरी आरोप झाले. आव्हाड यांच्याबाबतीत नक्की काय झाले, याची माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घ्यावी. ते संविधान बचाव मोहिमेत असतात. फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार सांगतात. त्यांना अटक कशी होते. कलमे कोणती लावतात. हे सगळे पोलिस कोणाच्या तरी सांगण्याने वागतात, असे वाटत आहे.

राज्य कारभारावर लक्षच नाही

राज्याला यशवंतराव चव्हाण यांच्यापासून माेठी परंपरा आहे. सध्या जे चालले आहे ते राज्याला परवडणारे नाही. पूर्वीच्या सरकारने योग्य निर्णय घेतला नाही, असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कायम सांगतात. चांगले झाले तर त्यांनी केले, वाईट झाले तर ती आमची चूक असे चालणार नाही. किती दिवस आमच्या नावाने खडे फोडणार आहेत. सहा महिने झाले तरीही यांचे राज्य कारभारावर लक्ष नाही.

सरकारच्या कारभाराविरोधात आम्ही आवाज उठवत आहोत. आव्हाड यांनी राजीनामा देण्याची गरज नाही. गर्दीमधून जाताना एखाद्याला धक्का लागला तर तो विनयभंग होत नाही. ज्यांना धक्का लागला म्हणतात त्या भगिनी भाजपच्या पदाधिकारी आहेत, यावरून जाणीवपूर्वक ते कलम लावून गुन्हा दाखल झाला आहे, असे स्पष्ट दिसते.

- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

Web Title: ajit pawar said There is no crack from the government, whatever you think is going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.