पुणे: आम्ही पुरोगामी विचारसरणीला मानतो म्हणून आम्ही हातामध्ये गंडादोरे घालत नाही काही, जण अजूनही अशा अंधश्रद्धेच्या बाबींना बळी पडत आहेत असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केले. परंतु अजित पवार असे म्हणत असले तरी त्याचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांच्या हातात बरेच गंडेदोरे बांधल्याचा फोटो सोशल मिडीयातून समोर आला आहे. विधानभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कोरोना आढावा बैठकीत ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात, देशात आपल्याला अनेक भोंदूगिरी बाबा दिसतात नागरिक त्याला बळी पडत आहेत. अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिलेल्या आहेत. चुकीच्या प्रकारे कोणी नागरिकांची फसवणूक करत असेल त्याला पाठीशी घालण्याची गरज नाही. स्वर्गीय नरेंद्र दाभोळकरांच्या बरोबर चर्चा करून जादुटोणा कायदा लागू केला. आम्ही हातामध्ये गंडा- दोरा कधी घालत नाही. अशा प्रकारच्या जादूटोण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढत असल्या तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे पवार यांनी सांगातले.