अजित पवार गायबच! त्यांनी पुण्यातून कारभार चालवावा: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 01:22 PM2021-04-23T13:22:51+5:302021-04-23T14:22:02+5:30
केंद्रांनी सर्वाधिक रेमडेसीवीर महाराष्ट्राला दिले. आणखी साठी मी भीक मागायला तयार: पाटील
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे गायबच होते, असा दावा भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. अजित पवारांनी पुण्यात शिफ्ट व्हावे आणि इथून कारभार चालवावा किंवा पालकमंत्री पद दुसऱ्या कोणाला तरी द्यावे असेही पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार हे गायब असल्याचा दावा केला होता. त्यानंतर अजित पवारांनी पत्रक काढत भाजप नेत्यांवर टीका केली होती आणि मी आपल्या कार्यकर्त्यांसाठी सतत उपलब्ध असतो. तसेच भाजप चे नेते देखील मला भेटत असतात असा दावा केला होता. याबाबत बोलताना पाटील यांनी पुन्हा हा दावा केला आहे.
पुण्यामध्ये शुक्रवारी ( दि. २३) चंद्रकांत पाटील यांचा हस्ते कोविड केअर सेंटर चे उदघाटन झाले. एसएनडीटी कॉलेज मध्ये हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. १०० बेड चे हे केंद्र विलगीकरणासाठी उपयोगी ठरणार आहे. या उद्घाटनानंतर पाटील बोलत होते.
अजित पवारांचा वक्तव्याबाबत पाटील म्हणाले " देशात लोकशाही आहे त्यामुळे कोणीही काहीही बोलू शकते. पण मी चॅलेंज केले होते की, अजित पवारांना फोन लावून द्या, कारण ते गायबच होते. २४ तास ते कोणालाच उपलब्ध झाले नव्हते. अजित पवारांच्या कार्यक्षमतेबद्दल माझा मनात शंका नाही. पण वाढत असलेला कामाचा व्याप पाहता मला असा वाटतं की, त्यांनी एकतर पुण्यातून किंवा मुंबईतून कारभार चालवावा. आणि पुण्याला वेगळा पालकमंत्री द्यावा. पण एकूण गरज लक्षात घेता त्यांनी पुण्यातून कारभार चालवायला पाहिजे आणि पुण्यात सहज उपलब्ध व्हायला हवे. लोकांना आता दिलासा हवा आहे."
दरम्यान. रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत राजेश टोपे यांनी केलेल्या दाव्याबद्दल पाटील म्हणाले " ग्लास अर्धा भरला आहे असाही म्हणता येतं किंवा रिकामा आहे असेही म्हणता येतं. महाराष्ट्र सरकारने त्यांचं अपयश लपवण्यासाठी सारखे केंद्राकडे जायचे ठरवलंय. नाहीतर तो चार्ट पहिला तर सगळ्यात जास्त इंजेक्शसन ही महाराष्ट्राला मिळाली आहेत. १० दिवसांसाठी.तब्बल २ लाख ६९ हजार इंजेक्शन्स दिली आहेत. ज्या गुजरातच्या नावाने आरडाओरडा होतो त्यांना पण १ लाख ४० हजार मिळाली आहेत.
रेमडेसिवीर मिळत नसल्याचा दावा करत पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना आपण एक कोटी रुपये घेऊन अजित पवारांच्या टेबलवर ठेवा असं सांगितल्याचे ही पाटील म्हणाले. " मी एक घोषणा करतो. महापालिका आणि सरकार ला अॅडव्हान्स पैसे देता येत नाहीत. तर जो डिस्ट्रिब्युटर अॅडव्हान्स पैसे मागेल त्याला भीक मागून पैसे गोळा करून मी देणा आहे. त्यांचे मिळाले की मला परत द्यायचे. मी मागितले की भीक जास्त मिळते. १०० कोटींचे इंजेक्शन घेऊ. संपूर्ण महाराष्ट्रात मी अॅडव्हान्स द्यायला तयार आहे"