अजित पवारांनी निर्णय घ्यावा, अन्यथा सोमवारपासून दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवणार : पुणे व्यापारी महासंघाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 09:02 PM2021-08-06T21:02:31+5:302021-08-06T21:03:49+5:30

शनिवार-रविवार लाॅकडाऊन पाळणार; रविवारी निर्णय जाहीर करण्याची मागणी

Ajit Pawar should take a decision, otherwise he will start shops from Monday: Pune Merchant Federation | अजित पवारांनी निर्णय घ्यावा, अन्यथा सोमवारपासून दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवणार : पुणे व्यापारी महासंघाचा इशारा

अजित पवारांनी निर्णय घ्यावा, अन्यथा सोमवारपासून दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवणार : पुणे व्यापारी महासंघाचा इशारा

Next

पुणे : शहरातील सर्व व्यापारी शनिवार-रविवारचा लॉकडाऊन पूर्ण पाळणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हा प्रशासनाने शहरातील सर्व दुकानांच्या वेळा वाढवण्याचा निर्णय रविवारी होणाऱ्या कोरोना आढावा बैठकीत जाहीर करावा.  अन्यथा सोमवारपासून पुन्हा शहरातील दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत  आम्ही सुरू ठेवणार आहे, असे स्पष्टपणे पुणे व्यापारी महासंघाने जाहीर केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. या विरोधात लक्ष्मी रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी निर्बंध झुगारुन सलग तिसऱ्या दिवशीही दुकाने उघडी ठेवली आहेत. नियम डावलून सुरू असलेल्या दुकानांचे पोलिसांनी शुक्रवारीही फोटो काढले. मात्र, व्यापारी आपल्या  भूमिकेवर ठाम आहेत.  
 
सद्यस्थितीत आम्ही सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दुकाने सुरु ठेवली आहेत. व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार कसे करायचे, असे प्रश्न उभे राहिले आहेत. त्यामुळे शासनाने व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन वेळ वाढवून द्यावा, असे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले. 
----
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रविवारी पुण्यात कोरोना आढावा बैठक आहे. या बैठकीत शहरातील सर्व  व्यापाऱ्यांच्या मागणी संदर्भात योग्य निर्णय जाहीर करतील, अशी आपेक्षा आहे. दुकानांची वेळ वाढवून मिळाली नाही, तर सर्व व्यापारी दुकाने सुरू ठेवणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने याचा विचार करावा.
- फत्तेचंद रांका, अध्यक्ष, पुणे व्यापारी महासंघ

Web Title: Ajit Pawar should take a decision, otherwise he will start shops from Monday: Pune Merchant Federation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.