पुरंदर तालुक्यातील ढगफुटीनंतर उद्भवलेल्या पूरस्थितीबाबत अजित पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 04:02 PM2019-09-26T16:02:43+5:302019-09-26T16:15:45+5:30

आचारसंहिता असताना पिण्याचे पाणी,अतिवृष्टी ,गारपीट, भुकंप झाल्यास त्याला मदतीसाठी आचारसंहिता आड येत नाही..

Ajit Pawar talks to CM about flood situation in Purandar taluka | पुरंदर तालुक्यातील ढगफुटीनंतर उद्भवलेल्या पूरस्थितीबाबत अजित पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

पुरंदर तालुक्यातील ढगफुटीनंतर उद्भवलेल्या पूरस्थितीबाबत अजित पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Next
ठळक मुद्देप्रथम घरात पाणी शिरलेल्या नागरिकांना मदत : सध्या वीजपुरवठा खंडित ...धरणाच्या इतिहासात प्रथमच मोठा पाऊस ... उजनीतील १ लाख क्युसेक्स विसर्ग

बारामती : पुरंदर तालुक्यातील ढगफुटीनंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन त्यांना बारामतीच्या पुरस्थितीबाबत माहिती दिली. बारामती येथे खुद्द पवार यांनीच पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली.पवार यांनी तत्पुर्वी शहरातील पुरग्रस्तांची भेट घेवुन चर्चा केली.पुरग्रस्तांना पुरविण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती घेतली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, नुकतीच मुख्यमंत्र्यांशी पुरस्थितीबाबत चर्चा करण्यात आली आहे. त्यांना याबाबत रिपोर्ट करण्यात आला आहे.पुरग्रस्तांना मदतीसाठी आचारसंहितेची अडचण येवु नये,यासाठी
त्यांना विनंती करण्यात आली आहे. आचारसंहिता असताना पिण्याचे पाणी,अतिवृष्टी ,गारपीट, भुकंप झाल्यास त्याला मदतीसाठी  आचारसंहिता आड येत नाही ,असे पवार म्हणाले. शहरात जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक थांबुन आहेत.शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अनेक शेतांमध्ये पाणी शिरले आहे.प्रथम घरात पाणी शिरलेल्या नागरिकांना मदत केली जाईल. त्यानंतर शेतीचे पंचनामे केले जाईल. सध्या वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.लवकरच तो पूर्ववत केला जाईल,असे पवार म्हणाले.
——————————————
...धरणाच्या इतिहासात प्रथमच मोठा पाऊस 
बुधवारी(दि २५)  रात्री १० ते ११ च्या दरम्यान, पुरंधर ताुलक्यातली गराडे येथे ढगफुटी झाली.यावेळी साडेंचार ते पावणे पाच इंच ऐवढा प्रचंडपाऊस एक  तासात  पडला. मधल्या काळात गराडे आणि इतर धरणे भरली गेलेलीहोती. रात्री सगळ्या पावसाचे नदीच्या कऱ्हा पात्रात उतरले.कऱ्हा नदीतीलपाणी शेवटी  पाणी नाझरेमध्ये आले.त्यामुळे  वरुन येणारे पाणी ८५ हजार क्युसेक्सचे झाले.
त्यामुळे नाझरेतुन येणारे पाणी ८५ हजार क्युसेक्सने  पाणी सोडण्यास सुरवात झाली. धरणाची क्षमता देखील ८५ हजार क्यूसेक्स आहे. नाझरेतील पाणी बारामतीत येण्यास ८ ते १० तास लागतात.नाझरेतील कऱ्हा नदीत सोडण्यात येणारा  विसर्ग रात्री ८५ हजार क्युसेक्सवरुन ते पाणी ३५ हजार क्युसेक्स करण्यात आला  आहे.त्यानंतर  हाच विसर्ग ३५ हजाराचा विसर्ग २० हजार क्युसेक्स करण्यात आला. आताच्या घडीला १४ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. गेट बंद झाल्यावर एक ठीपका पाणी येणार नाहि. नाझरे परीसरात रात्री अचानक पाऊस पडला,ते पाणी नाझरेत आल्यास नदीच्या पात्रात मावेल एवढेच पाणी नदी पात्रात येईल. त्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.
———————————
... उजनीतील १ लाख क्युसेक्स विसर्ग
कऱ्हा आणि निराचा संगम सोनगाव परिसरात होतो.त्या ठिकाणी देखील दिवसा पाणी वाढेल,रात्री पाणी कमी होईल. नाझरेचे पाणी जवळपास १० ते १२ हजारक्युसेक्स ने सुरु आहे.ते देखील लवकरच बंद होईल. तसेच, निरेचे पाणी आता  बंद होईल.पुणे शहरातील पाणी उजनीमध्ये सोडले जाते.दौंड मार्गे ते पाणी उजनी जलाशयात पोहचण्यासाठीआवश्यक कालावधी गृहित धरुन उजनीतील पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.आज सकाळी उजनीतील १ लाख क्युसेक्स विसर्ग आहे.त्यामुळे पुण्यातील पाणी उजनी पात्रात आल्यानंतर देखील काळजी करण्याचे कारण नाही,असे  अजित पवार यांनी सांगितले.
——————————————————

Web Title: Ajit Pawar talks to CM about flood situation in Purandar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.