बारामती: बारामती शहरात गेल्या तीन चार दिवसांक कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांचा भडका उडाला होता.जवळपास ४०० रुग्ण शहर तालुक्यात आढळले आहेत.या पार्श्वभुमीवर नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी १४ दिवसांचा जनता कर्फ्यू जाहिर करण्यात आला आहे.मात्र, हा निर्णय घेताना विश्वासात घेतले नसल्याचे सांगत व्यापाऱ्यांनी विरोध केला.त्यानंतर १४ दिवसांचा जनता कर्फ्यु ७ दिवसांवर आणण्यात आला आहे.यामध्ये रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर कर्फ्यु कमी करण्यात येईल. मात्र, रुग्णसंख्या वाढल्यास १४ दिवसांचा कर्फ्यु पुढे सुरुच राहणार असल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.शुक्रवारी(दि. ४) बारामती नगरपालिका प्रशासना कडून दि.७ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर(१४ दिवस) या कालावधी साठी जनता कर्फ्यू लागू होणार असल्याचे जाहिर करण्यात आले होते. अनेक लोकांच्या बंद बाबतीत मागणी स्वरुपाच्या सूचना आल्यामुळे हा बंद घेण्यात आल्याचे तावरे यांनी पत्रकार परिषदेमधे सांगितले.
वास्तविक पाहता या निर्णयासाठी अधिकारी वर्गाने सर्व प्रकारच्या व्यापारी वर्गाचे व नागरिकांचे मत घेणे अपेक्षित होते. कोरोना रुग्णा ची संख्या व परिस्थिती गंभीर असल्यामुळे प्रशासनास हा निर्णय घेणे जरूरी चे वाटत असले तरी, व्यापारी व प्रातिनिधिक स्वरुपात नागरीकां बरोबर चर्चा होणे गरजेचे होते. कोरोना इतकीच गंभीर परिस्थिती व्यापारी व सामान्य नागरिक यांची आर्थिक बाबतीत झालेली आहे. मागील लॉकड़ाऊननंतर आत्ता कुठे परिस्थिती थोड़ी सावरत असताना पुन्हा हा संपूर्णत: स्वरुपाचा लॉकड़ाऊन होऊ घातला आहे. शेतकरी वर्गाचे खरीप हंगामाचे पिक बाजारात येऊ घातले आहे. मुग,बाजरी,मका ही पिके निघालेली आहे. रोजच पावसाचे सावट असताना ती विकण्या साठी ची व्यवस्था उपलब्ध नसेल तर शेतकरी वागार्ची मोठी कुचंबना होणार आहे. केंद्र सरकारने मागे जाहिर केलेल्या लॉकड़ाऊन मधे सुद्धा मार्केट यार्ड वरील व्यवहार चालू ठेवण्यास परवानगी होती जी या वेळेस च्या बंद मधे देण्यात आलेली नाही. या वर चर्चा होणे गरजेचे वाटते आहे. टकऊउ च्या व्यापारी वर्गाने बरोबर ज्याप्रकारे प्रशासनाने चर्चा करून मार्ग काढला आहे अश्या प्रकारची चर्चा व्हावी ,अशी मागणी दि बारामती मर्चेन्ट्स असोसिएशनचे महावीर वडुजकर यांनी केली होती.कर्फ्युला आमचा विरोध नसुन काही बाबतीत चर्चा करून आमच्या व शेतकरी वर्गाची अडचण अधिकारी वर्गाने जाणून घ्यावी ही अपेक्षा असल्याचे वडुजकर यांनी स्पष्ट केले होते.
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, व्यापाऱ्यांचे आर्थिक कंबरडे आधीच मोडले आहे. त्यातच १४ दिवसांचा लॉकडाऊनमुळे हा निर्णय न परवडणारा होता.याबाबत व्यापारी महासंघाला विश्वासात घेतले नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करण्यात आली.त्यानंतर उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे,नगराध्यक्षा,पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांच्या अडचणी मांडल्या.त्यानंतर निर्णय बदलण्यात आल्याचे गुजराथी यांनी सांगितले.शहरातील निर्णय घेताना व्यापाऱ्यांना विश्वासात घेण्याची अपेक्षा आहे.————————————————...कर्फ्युमधुन वृत्तपत्र,दुधाला सुटबारामतीत ७ दिवस जनता क र्फ्यु जाहिर करण्यात आला आहे.यामध्ये शहराच्या सीमा सील करण्यात येणार आहे. एमआयडीसीतील कंपन्या वगळता संपुर्ण सेवा व्यवसाय बंद राहणार आहेत. मात्र, यामध्ये वृत्तपत्र,दुधासह अत्यावश्यक सेवा व्यवसाय कर्फ्युमधुन वगळण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.जीवनावश्यक वस्तुंचा साठा करण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.———————