पुणे/मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर असताना बारामतीलाही भेट देत असतात. मतदारसंघातील त्यांच्या भेटीगाठीमुळेच त्यांनी मतंदारसंघात मोठी पकड आहे. त्यामुळेच, बारामतीमधून लाखांची आघाडी घेऊन त्यांना विजय मिळतो. कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारा आणि बेधडक वागणारा नेता म्हणून अजित पवारांचा राज्यात दरारा आहे. बारामीत दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी एका चहावाल्याची इच्छा पूर्ण केली.
उपमुख्यमंत्री यांचा आज बारामती दौरा होता. या दौऱ्यात विविध विकास कामांची पाहणी अजित पवारांनी केली. त्यानंतर येथे आयोजित महाआरोग्य शिबिराचा कार्यक्रम आटोपून जात आसताना एका कार्यकर्त्याने अजित पवारांकडे इच्छा व्यक्त केली, तसा आग्रहही धरला. दादा... मी फिरत्या वाहनावर टी स्टॉल चालू केले आहे, याचे उद्घाटन आपण करावे ही इच्छा या कार्यकर्त्याने बोलून दाखवली. त्यावेळी, उपमुख्यमंत्र्यांनी फीत कापून कसदार चहा स्टॉलचे उद्घाटन केले.
... तेव्हा लिफ्टमनला विचारला होता प्रश्न
अजित पवार नवेनवे उपमुख्यमंत्री झाले तेव्हा मंत्रालयातील लिफ्टमधून वर जात होते. लिफ्टमनला त्यांनी विचारलं, काय! किती पगार मिळतो तुला? लिफ्टमन म्हणाला साहेब! आठ हजार मिळतात. कामगारांना १५ हजार रुपये किमान वेतन असलं पाहिजे असा कायदा असताना चक्क मंत्रालयातच लिफ्टमनला आठ हजार रुपये कसे मिळतात म्हणून अजितदादा अस्वस्थ झाले अन् माहिती घेण्यास त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. माहिती मिळाली की, मंत्रालयात लिफ्टमन, सफाई कामासाठी मनुष्यबळाचं कंत्राट दोन कंपन्यांना दिलेलं आहे. त्या कामगारांना किती पगार देतात, शासन कंपन्यांना प्रत्येक कामगारामागे किती पैसा देत असते, याची विसंगती पुढे शोधली गेलीच नाही. सही एका रकमेवर घेतली जाते आणि हातात कमी पैसे टिकवले जातात, असे काही कामगार दबक्या आवाजात सांगतात.