"कोरोना नियम न पाळल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करणार" अजित पवारांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 05:05 PM2021-08-08T17:05:24+5:302021-08-08T17:05:39+5:30
ठरवलेल्या नियमांचे पालन करायला पाहिजेच. तसेच मास्कचाही वापर करावा
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील निर्बंधात सूट देत अजित पवारांनी दुकानाच्या वेळा वाढवण्याबरोबरच हॉटेल आणि अन्य आस्थापना यांनाही सूट दिली आहे. पण दोन्ही शहरातील नागरिकांनी नियम न पाळल्यास कडक पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात येतील असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे पुण्यातल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. ठरवलेल्या नियमांचे पालन करायला पाहिजेच. तसेच मास्कचाही वापर करावा असेही ते म्हणाले आहेत.
दुकानांच्या बाबतीत बोलताना पवार म्हणाले, दुकानांचे मालक, सेल्समन यांच्याबद्दल तक्रार येते की मास्क वापरत नाहीत. असं होता कामा नये. कुठलीही चूक होता कामा नये. सहा दिवस 8 पर्यंत दुकानं सुरू राहतील, मालक, सेल्समन यांनी दोन्ही लस घेतलेलेच असले पाहिजे.
सर्व हॉटेल, रेस्टॉरंट सर्व दिवशी ५० टक्केने सुरू राहतील. जलतरण सोडून सगळे गेम सुरू राहतील. त्याठिकाणी सोशल डिस्टंसीग पाळणे गरजेचे आहे. मॉल रात्री 8 पर्यंत सुरू राहतील. दोन्ही लसी घेतलेल्यांनाच आत प्रवेश असेल. दर 15 दिवसात स्टाफचं मेडिकल तपासणी होईल. असेही त्यांनी सांगितले आहे.
शाळांबाबतीत मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंगळवारी कॅबिनेट मिटिंग मध्ये चर्चा करू. राज्याच्या धार्मिक स्थळाविषयी जो निर्णय घेतला जाईल तोच पुण्याच्याबाबतीतही लागू असेल.