शहरं
Join us  
Trending Stories
1
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
2
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
3
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
4
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
5
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
6
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
7
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
8
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
9
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
10
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
11
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
12
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
13
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
14
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
15
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
16
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
17
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
18
'या' भाषा भारतात सर्वाधिक बोलल्या जातात; तुम्हाला माहितीये का?
19
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
20
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे

सामान्यांच्या संकटकाळात धावून येणारे 'अजितदादा'; जखमी कार्यकर्त्याच्या एका कॉलवर केली मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 8:01 PM

डॉक्टरांना सूचना देत तरुणावर आवश्यक उपचार करण्याबाबत चर्चा केली

बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर नेहमीच मजबुत पकड असल्याचे वेळोवेळी सिध्द झाले आहे. पवार यांची त्यासाठी असणारी कार्यपध्दती बुधवारी(दि २३ ) झालेल्या एका घटनेमुळे अधोरेखित झाली आहे. अपघातात गंभीर जखमी कार्यकर्त्याला पाहुन एकाने थेट अजित पवार यांना मदत मागितली. पवार यांनी देखील तातडीने जखमीला मदत करीत उपचार मिळवुन दिले.

कटफळ(ता.बारामती) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तानाजी पांडुरंग मोकाशी बुधवारी (दि २३) हे शिखर शिंगणापूर वरून घरी परतीच्या वाटेवर होते. यावेळी मेखळी मार्गावर डोलेर्वाडी फाट्या नजिक टँकरने अचानक वळण घेतले. त्यामुळे  मोकाशी यांच्या दुचाकीची टँकरला धडक लागून अपघात झाला. या अपघातात मोकाशी यांच्या डोक्याला गंभीर स्वरुपाची इजा झाली. ही घटना घडल्यावर एकाने थेट अजित पवार यांच्याशी संपर्क साधला. तसेच या अपघाताची माहिती दिली. पवार यांनीही तातडीने स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांना त्याच्या उपचारासाठी आवश्यक मदत करण्याची सुचना केली. त्यानंतर देखील ते थांबले नाहित. प्रत्येक तासाला त्यांनी या कार्यकर्त्याच्या प्रकृतीची विचारपूस करीत त्याच्या प्रकृतीची माहिती घेतली. डॉक्टरांना सूचना देत त्याच्यावर आवश्यक उपचार करण्याबाबत चर्चा केली. ‘अजितदादां’च्या बांधिलकीची आज सर्वत्र चर्चा होती.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMobileमोबाइलPoliticsराजकारण