पुणे : पुण्यातील कोयता गॅगचा सुफडा साफ करणार आहे. १२ ते १५ वर्षाची मुले हातात कोयता, तलवारी हातात घेउन फिरत बसतात. त्यांना जरब बसविणार आहे. त्यांचे वय लहान असल्यामुळे आम्हाला कायदयाची अडचण येते. त्यामुळे या मुलांच्या आईवडींला बोलविणार आहे. त्यामुळे मुलांना नीट वागायला शिकवा. आम्ही कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
वडगावशेरी मतदारसंघातील १७५ कोटीच्या कामाचे भुमिपुजन आणि उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार सुनिल टिंगरे पांडुरंग खेसे, अशोक खांदवे आदी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी आज ९ हजार ८०० कोटी रूपयांच्या वेगवेगळी टमिनल आणि विमानतळाचे उदघाटन केले आहे. मेट्रोने रोज जाणा०या नागरिकांची संख्या १५ हजाराने वाढली आहे. मेट्रोचे काम पुर्ण झाल्यावर रिक्षा आण बसेसवरील ताण कमी होणार आहे. विमानतळाची लांबी वाढवत आहे. राज्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम करत आहे. सगळे प्रकल्प गुजरातला चालले आहे अशा थापा विरोधक मारत आहे. काही गुजरातला चालले नाही. महाराष्ट्रातील गोष्टी महाराष्ट्रातच राहणार आहे. पुणे आणि पिपंरी चिचंवडला रिंगरोडसाठी जमीन ताब्यात घेण्याचे काम अंतिम टप्पात आहे. या रस्त्यामुळे बाहेरच्या बाहेर लोकांना जाता येणार आहे. आता वाहतुक काेंडीचा त्रास होत आहे. आता कृषिविघापीठातुन रस्ता करत आहे. तो ३० मार्च पर्यत पुर्ण होणार आहे. पुणे महापालिकेचे ११ हजार ६०० कोटीचे तर राज्याचे बजेट ६ लाख कोटीचे बजेट आहे असेही पवार यांनी सांगितले.
आता पदर नाही डायरेक्ट टायरमध्ये
शहराची कायदा सुवस्था चांगली राहिली पाहिजे. कसली रे कोयता गॅग. कोयता गॅगचा सुफडा साफ करणार आहे .१२ ते १५ वर्षाची मुले हातात कोयता, तलवारी हातात घेउन फिरत बसतात. त्यामुळे या मुलांच्या आईवडींला बोलविणार आहे. तुमचा मुलगा काय दिवा लावतो ते पहा. त्यामुळे आई वडीलांनी मुलां, कार्टला नीटपणे वागायला शिकविले पाहिजे. मला काय माहिती माझे पोरग असे काय करले ते ऐकुन घेणार नाही. आईवडीलांना मुला मुलीचे मित्र मैत्रिणी कोण आहेत तो काय करतो हे माहिती असायला पाहिजे. किती मोठया बापाचे असेल तर मुलाहिजा ठेवणार नाही. दादा एकदा चुक झाली आता पदरात घ्या. पदर आमचा फटाला आहे. आता पदर नाही. धोतर नाही. आता डायरेक्ट टायरमध्येच जाणार आहे. विश्रांतवाडीत परवाच घडले. त्यांना हडुकन काढतो . पुणे विघेचे माहेरघर आहे. त्याकमीपणा वाटेल असे वागु नका असे अजित पवार यांनी सांगितले. नवीन पोलिस आयुक्त आल्यानंतर साडेचार हजार कोटीचे ड्रग्ज पकडले आहे. त्याचे धागेदोरे लंडन, पजाब , दिल्ली मध्ये निघाले. झटपट श्रीमंत होण्यासाठी उघोग करत आहे. चांगले लोक अडचणीत आणि नवीन पिढी व्यसनाधीन होत आहे असेही त्यांनी सांगितले.
झाडे तोडू नका
पुण्यात विकास कामेे करण्यासाठी घेतल्यावर झाडे तोडु नका असे सांगुन स्थगिती दिली जाते. त्यामध्ये १५ ते २० दिवस जातात. कोटाचे निणर्य ऐकावे लागतात असेही अजित पवार यांनी सांगितले.
दिवसभरात १हजार १७५ कोटीची भुमिपुजने , उदघाटने वारजे येथे ५०० कोटी , लोहगाव विमानतळ ५०० कोटी आणि वडगाव शेरी मतदारसंघातील १७५ कोटीची भुमिपुजने आणि उदघाटनाचे कामे करण्यात आली आहे. पायाभुत सुविधा, दर्जदार आणि सौदर्यपुर्ण आणि गुणवत्तापुर्ण कामे झाली पाहिजेत. कामा मध्ये हलगर्जीपणा खपवुन घेणार नाही. कामामध्ये कुचराई करणा०या ठेकेदाराला काळया यादीत टाकेले जाणार आहे. यंदाच्या बजेटमध्ये शहरात सर्वात जास्त निधी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाला दिला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.