सरकारला सत्तेची नशा चढली काय? अजित पवारांचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 05:57 PM2022-12-10T17:57:10+5:302022-12-10T18:00:03+5:30

राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची राज्य सरकारवर टीका....

Ajit Pawar's angry question Is the government addicted to power? | सरकारला सत्तेची नशा चढली काय? अजित पवारांचा संतप्त सवाल

सरकारला सत्तेची नशा चढली काय? अजित पवारांचा संतप्त सवाल

Next

पाटेठाण (पुणे) : सहा महिन्यांपूर्वी राजकीय अपघाताने सत्तेवर आलेल्या सत्ताधारी मंडळींमध्ये रोज नवनवीन वाचाळवीर पैदास होत आहेत. सत्ताधारी वाचाळवीर अगदी बेफानपणे थोर महापुरुषांच्या तसेच महिला भगिनींच्या बद्दल काही ना काही गरळ ओकत जणू बदनामी करत आहेत. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नसून परिणामी सरकारला सत्तेची नशा चढली काय असा संतप्त सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

मिरवडी (ता.दौंड) येथे ग्रामपंचायतीच्या नवीन ग्रामसचिवालयाचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, तुम्ही महापुरुषांची बदनामी करता तुम्हाला अधिकार काय? आपण राज्यपाल आहात, तुम्हाला जर जमत नसेल तर तुमच्या राज्यात जावा, पण आमची बदनामी करू नका, अशी टीका त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर केली. याचबरोबर स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून जनहितासाठी प्राधान्य द्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणे ही महाराष्ट्राची परंपरा नसून सत्तेची मस्ती आल्यासारखे न वागता जनसेवेला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे पवार सांगितले.प्रास्ताविक सरपंच सागर शेलार यांनी तर आभार उपसरपंच शांताराम थोरात यांनी मानले.

यावेळी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्ष वैशाली नागवडे, वीरधवल जगदाळे, आप्पासाहेब पवार, उद्योजक एल. बी. कुंजीर, डॉ. वंदना मोहिते, योगिनी दिवेकर, राणी शेळके, सुशांत दरेकर, बाळासाहेब शिंदे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Ajit Pawar's angry question Is the government addicted to power?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.