टकारी समाजाची मागणी योग्य : अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 01:29 AM2018-10-05T01:29:56+5:302018-10-05T01:30:11+5:30
टकारी समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. नामदेव जाधव म्हणाले, ‘टकारी समाज संघ महाराष्ट्र प्रदेश यांनी टकारी समाज अनुसूचित जमातीत कसा जाऊ शकतो,
बारामती : टकारी समाजाची मागणी योग्य आहे. या समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश होण्यासाठी आवश्यक मदत करू, असे आश्वासन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. बारामती येथे नुकताच बारामती विभागीय टकारी समाजाचा मेळावा आयोजित केला होता. या वेळी पवार बोलत होते.
टकारी समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. नामदेव जाधव म्हणाले, ‘टकारी समाज संघ महाराष्ट्र प्रदेश यांनी टकारी समाज अनुसूचित जमातीत कसा जाऊ शकतो, याबाबत पंधरा पुरावे शासन व प्रशासन दरबारी सादर केले आहेत. नव्वद टक्के काम मार्गी लागले आहे. समाजबांधवांनी एकत्र येऊन ताकदीनिशी लढा दिला पाहिजे.’ यावेळी माजी उपनगराध्यक्ष अनिल गायकवाड, टकारी समाज संघ उपाध्यक्ष ओंकार जाधव, टकारी समाज संघ संघटक संतोष जाधव, बाळासाहेब गायकवाड, गणेश गायकवाड, संजय जाधव, महेंद्र गायकवाड, सुरेंद्र गायकवाड, श्याम जाधव, प्रशांत जाधव, महेश गायकवाड, विल ास गायकवाड, रमेश गायकवाड, सुभाष जाधव, प्रल्हाद जाधव, सुनील गायकवाड, राहुल गायकवाड, अनिल जाधव, संजय गायकवाड, शेखर गायकवाड यांच्यासह बारामती शहर व तालुक्यातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.