बारामती - बारामती शहरात गेल्या काही दिवसांत झालेल्या गंभीर घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठा आहे.मात्र, कायदेशीर अडचणींमुळे गंभीर गुन्हे करणार्या या मुलांवर कारवाइ करताना पोलीस प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होते.राज्यात अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत वाढता सहभाग पाहता याबाबत कायद्यात बदल करण्याची गरज आहे.त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
बारामती येथे पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यातील वाढत्या सहभागाबाबत चिंता व्यक्त केली आहे. पवार म्हणाले,गुन्हा करणाऱ्या अल्पवयीन मुलांची वयोमर्यादा १४ वर्षाच्या आत ठेवण्याची गरज आहे.आपला काळ आणि आजच्या पिढीचा काळ यामध्ये मोठा फरक आहे.आताची पिढीची प्रखर बुद्धीमत्ता आहे.परीणामी आजची परिस्थिती वेगळी बनली आहे. या संदर्भात आम्ही गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहोत. राज्यसरकार याबाबत कायदा करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. कारण हा विषय केंद्राशी निगडित आहे. शालेय विद्यार्थी १४ वर्षाच्या पुढे गेले की त्यांचा वापर हा गुन्हेगारीसाठी केला जात आहे. या मुलांमध्ये रागावर नियंत्रण न ठेवण्याची वृत्ती देखील वाढत आहे. यामुळे गुन्हे वाढत आहेत. दरम्यान, ही मुळे अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर गुन्हेगाराप्रमाणे कारवाई केली जात नाही. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अल्पवयीन गुन्हेगाराचे वय १४ वर्षाच्या आत असण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली आहे.
चौदा वर्षाच्या पुढील प्रत्येक युवकाचा गुन्ह्यातील सहभाग कडक कारवाइसाठी पात्र ठरावा, हे अधिकाऱ्यांचं देखील हेच म्हणणं आहे.गंभीर गुन्हा करणार्या अल्पवयीन मुलांना कमी वय असल्याने,तसेच १८ वर्ष होइपर्यंत आपण गुन्हात अडकू शकत नसल्याचे माहिती आहे.बारामतीत नुकत्याच झालेल्या गंभीर गुन्ह्यातील मुले देखील अल्पवयीन आहेत.शहरात वेदना देणारी दुर्दैवी घटना घडली आहे.अल्पवयीन मुलांच्या वयाच्या कायदेशील बाबीची वरीष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे.याबाबत ‘डीपार्टमेंट’च्या अधिकार्यांनी वयात बदल करण्याची गरज व्यक्त केली आहे. अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे.हा कायद्यात बदल करताना केंद्र सरकारशी बोलाव लागणार आहे.राज्यात अल्पवयीन मुलांचा मुद्दा समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें,उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या कानावर देखील हि बाब सांगणार आहे.आम्ही या बाबत केंद्र सरकारला पत्र देऊन या बाबतचा प्रस्ताव देणार असल्याचे पवार म्हणाले.