Sharad Pawar ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. याआधी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत नेत्यांचे इनकमिंग सुरू झाले आहे. काल कोल्हापूरातील भाजपा नेते समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. तर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना झटका बसणार असल्याची चर्चा सुरू आहे. पिंपरी चिंचवड येथील नाना काटे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
कधी येतो, वेळ सांग... नितेश राणेंना भाजपच्याच नेत्याचे आव्हान; घराबाहेरच लावले बॅनर
विधानसभा निवडणुकीसाठी आता जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. महायुतीमध्ये पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदार संघ भाजपाला जाईल अशी चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रावादी शरदचंद्र पवार पक्षाला जाईल अशा चर्चा सुरू आहेत. यामुळे आता अजित पवार यांच्या पक्षातील नेते नाना काटे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहेत. गेल्या काही दिवसापासून त्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे.
खासदार शरद पवार यांनी काल कोल्हापूर येथील कागलमध्ये भाजपाच्या समरजीतसिंह घाटगे यांचा जाहीर प्रवेश केला. यानंतर आता खासदार पवार नाना काटे यांचा पक्षात प्रवेश करुन घेणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या चर्चांवर नाना काटे यांनी प्रतिक्रिया दिली.
"विधानसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली तेव्हाच मी अजित पवार यांना मी निवडणूक लढणार असल्याचे सांगितले आहे. त्यावेळी अजितदादांनी मला तु तुझ्या पद्धतीने लोकांशी संपर्क ठेव, गाठीभेटी घे, अजून कुठलीही जागा निश्चित झालेली नाही, असंही नाना काटे म्हणाले.
"मी येणारी विधानसभा निवडणूक लढणार आहे. त्यामुळे निश्चितच माघार नाही. जर जागा आम्हाला सुटली नाहीतर मी उमेदवार म्हणून राहणार आहे. अजून मला दुसऱ्या पक्षाच तसं काही आलेले नाही. पण येणारी निवडणूक मी चिन्हावर लढणार आहे. दादांनी मला अजूनही ही जागा कोणत्या पक्षाला गेलेले नाही असं सांगितलं आहे. ही जागा आमच्या पक्षाला गेली नाही तरीही मी निवडणूक लढणार आहे, असंही नाना काटे म्हणाले.
महायुतीत भाजपाला तिकिट मिळणार?
यामुळे आता नाना काटे अजित पवार यांच्या पक्षातून बाहेर पडून खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? या चर्चा सुरू आहेत. सध्या पिंपरी- चिंडवड मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप आहेत. त्यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे, दरम्यान, महायुतीकडून त्यांनाच तिकिट मिळणार असल्याचे बोलले जात आहे.