VIDEO | बारामतीत अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला; संभाजी राजेंबाबतच्या विधानावर भाजप आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 01:25 PM2023-01-02T13:25:16+5:302023-01-02T13:29:40+5:30
भाजपसह शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्ते आक्रमक होत अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला...
बारामती (पुणे) : नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्मवीर नव्हे, तर स्वराज्य रक्षक असा उल्लेख केला. यावरुन बारामतीत भाजपसह शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्ते आक्रमक होत अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सहयोग या निवासस्थानासमोर सोमवारी(दि २) सकाळी १०.३० दरम्यान हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवधर्म फाउंडेशनसह भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले.
कार्यकर्त्यांनी पवारांच्या सहयोग निवासस्थानासमोर जोरदार घोषणाबाजी करत अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी 'अजित पवार हाय हाय, धरणवीर अजित पवार', अशा घोषणा देण्यात आल्या. भाजपच्यावतीने भिगवन चौकात आंदोलन आयोजित करण्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी पोलिसांना गुंगारा देत अचानक कार्यकर्ते अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानासमोर एकत्र येत आंदोलन करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
बारामतीत अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध#AjitPawarpic.twitter.com/uhgDdInQmN
— Lokmat (@lokmat) January 2, 2023