स्वखर्चातून केली उभारणी : ग्रामस्थांचा प्रतिसाद
बारामती : शहरातील अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळाच्या वतीने तांदूळवाडी वेस चौक येथे श्रीमंत आबा लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन डॉ. सदानंद काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी डॉ. नाझीरकर, डॉ. दिलीप लोंढे, डॉ. विशाल गायकवाड यांच्यासह स्थानिक नगरसेविका बेबीमरिअम बागवान, शीतलताई गायकवाड, अनिता गायकवाड, सुभाष सोमाणी, अनिल गायकवाड उपस्थित होते.
स्वखर्चातून या लसीकरण केंद्राची उभारणी तांदूळवाडी वेस मंडळाने केली आहे. नागरिकांची लसीकरणाची सोय व्हावी या हेतूने हे केंद्र सुरू करण्यात आले. याधील स्टाफदेखील स्वखर्चातून आहे. नर्स, डॉक्टर्स यांच्यासह वैद्यकीय साहित्य, जागेचा खर्च हे मंडळाने केल्याने डॉ. सदानंद काळे यांनी मंडळाचे कौतुक केले. आज लसीचा ज्यांचा पहिला डोस पूर्ण होऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांची यादी महिला हॉस्पिटल बारामती यांच्याकडे पाठविली होती. अशा नागरिकांना या ठिकाणी लसीचा दुसरा डोस देण्यात आला.
लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव, मीटन पंजाबी, अविनाश भापकर, स्वप्नील शेळके, नीलेश गायकवाड, किरण इंगळे, स्वप्नील भागवत, प्रशांत हेंद्रे, वैभव जगताप, अमोल यादव, प्रांजल गायकवाड, राहुल जाधव, अतुल भागवत यांनी सहकार्य केले.
वरील लसीकरण केंद्रावर डॉ. मारुती कांबळे यांच्यासह अन्य कर्मचारी काम पाहत आहेत.
————————————————
फोटो ओळी : बारामती शहरातील अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळाच्या वतीने श्रीमंत आबा लसीकरण केंद्राचे उद्घाटन करताना डॉ. सदानंद काळे व उपस्थित मान्यवर.
२४बारामती तांदुळवाडी लसीकरण केंद्र
————————————————