शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

अक्षय तृतीयेला आंबा खाणार ‘भाव’

By admin | Published: April 20, 2015 4:30 AM

या वर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी आंबा महाग असेल, हा अंदाज खरा ठरला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत आंबा थोडा स्वस्त झाला असला तरी

पुणे : या वर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी आंबा महाग असेल, हा अंदाज खरा ठरला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत आंबा थोडा स्वस्त झाला असला तरी मागील वर्षी अक्षय तृतीयेला लाभलेल्या दरापेक्षा यंदा पुणेकरांना जास्त पैसे मोजावे लागतील. भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशी महती असलेल्या अक्षय तृतीयेकरिता आंबा घेण्यासाठी ग्राहकांनी रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डात बऱ्यापैकी गर्दी केली होती. अक्षय तृतीयेच्या (दि. २१) दिवशी रत्नागिरी हापूसला प्रतिडझन ३०० ते ८०० रुपयांपर्यंत दर राहील, असे आंब्याचे व्यापारी युवराज काची यांनी सांगितले. मागील वर्षी अक्षय तृतीयेला हा दर २०० ते ५०० रुपये इतका होता. मागील आठवड्यापेक्षा या आठवड्यात तयार हापूसच्या दरामध्ये सुमारे ५०० रुपये घट झाली. सध्या तयार हापूसच्या ४ ते ८ डझनाच्या पेटीस २००० ते ४००० रुपये दर आहे. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बाजारात तयार आंबा जास्त प्रमाणात विक्रीसाठी आला आहे. कर्नाटक आणि रत्नागिरीमधील सर्व प्रकारचा आंबा मिळून रविवारी बाजारात १४ ते १५ हजार पेट्यांची आवक झाली.