आळंदी नगरपरिषदेच्या सभागृहात मंगळवारी (दि.२) उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विषय समिती निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्याधिकारी अंकुश जाधव, नगराध्यक्षा वैजंयता उमरगेकर, गटनेते पांडुरंग वहीले, विरोधी पक्षनेते तुषार घुंडरे आणि नगरपरिषदेचे सोळा नगरसेवक उपस्थित होते.
नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांची स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापतिपदी, उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया यांची पाणी पुरवठा समितीच्या पदसिद्ध सभापतिपदी, भाजपचे नगरसेवक सचिन गिलबिले यांची यात्रा आणि आरोग्य समिती सभापतीपदी, भाजपचे नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे यांची बांधकाम समिती सभापतिपदी, मागासवर्गीय कल्याण समितीच्या सभापतिपदी भाजपच्या नगरसेविका सुनीता रंधवे, शालेय शिक्षण आणि क्रीडा समिती सभापतिपदी भाजपच्या नगरसेविका पारुबाई तापकीर आणि महिला आणि बालविकास समितीच्या सभापतीपदी शिवसेनेकडून निवडून आलेल्या नगरसेविका प्राजक्ता घुंडरे यांची निवड करण्यात आली. प्रत्येक समितीत भाजपचे ३ आणि शिवसेनेचे २ सदस्य गठीत करण्यात आले आहे.