शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

संगीत मैफलीत अलंकापुरी मंत्रमुग्ध

By admin | Published: February 06, 2015 11:42 PM

जगविख्यात सूरमणी पं. प्रकाशसिंहजी साळुंके यांच्या शास्रीय ख्याल, ठुमरी व क्लासिकल बहारदार गायनाने अवघी अलंकापुरी संगीत मैफलीच्या तालात मंत्रमुग्ध झाली.

शेलपिंपळगाव : पतियाळा घराण्याचे गायक, जगविख्यात सूरमणी पं. प्रकाशसिंहजी साळुंके यांच्या शास्रीय ख्याल, ठुमरी व क्लासिकल बहारदार गायनाने अवघी अलंकापुरी संगीत मैफलीच्या तालात मंत्रमुग्ध झाली. हजारो रसिकांनी गायनाला हात उंचावून दिलेली दाद कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. गुरुवर्य वै. संगीतरत्न मारोतीबुवा दोंदेकर यांचे शिष्य गायनाचार्य हभप सर्जेराव गावडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आळंदीत गंगागिरी सारळा बेट धर्मशाळेत संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. हभप सर्जेराव गावडे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संगीताचार्य वामनराव ईटणारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमप्रसंगी आमदार सुरेश गोरे, आमदार महेश लांडगे, लहरी गंधर्व व्ही. शांताराम पुरस्कृत पं. कोदंडसिंहजी साळुंके, खेड शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. देवेंद्र बुट्टे-पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, अध्यक्ष प्रकाश वाडेकर, माजी सभापती रामदास ठाकूर, नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, अ‍ॅड. सर्जेराव पानसरे, माजी उपसरपंच शिवाजी गावडे, अ‍ॅड. सुखदेव पानसरे, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे, प्रकाश कुऱ्हाडे, बबनराव कुऱ्हाडे, विलास कुऱ्हाडे, राजाभाऊ गावडे, अनिल लोखंडे, अ‍ॅड. राहुल वाडेकर, बहुळच्या सरपंच निर्मलाताई पानसरे, उद्योजक रमेश गोडसे, आयुर्वेदरत्न डॉ. जी. एम. सुतार, हभप अशोक साखरे, दत्तात्रय जैद, सदाशिव गावडे, पृथ्वीराज जाधव, अभिनव गंधर्व रघुनाथ खंडाळकर, बाळासाहेब वाईकर, पं. कल्याणजी गायकवाड, महागायिका कार्तिकी गायकवाड, सारेगमफेम ज्ञानेश्वर मेश्राम, विष्णुबुवा सोळुंके, राधाकृष्ण गरड, दासोपंत स्वामी, अशोकबुवा पांचाळ, महंत गणेशानंद पुणेकर, पुरुषोत्तम पाटील, यतिराज लोहोर, पांडुरंग शितोळे, उल्हास रोकडे, उपसरपंच बाळासाहेब चौधरी आदींसह आळंदीतील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी !प्रत्यक्ष चक्रपाणी उभा राहे !!’या श्री संत चोखा महाराजांच्या अभंगाने गोल्डन व्हाईस सौरभ साळुंकेने गणेशवंदना दिल्यानंतर सूरमणी पं. प्रकाशसिंहजी साळुंके यांनी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींना अभिवादन करून शास्रीय गायनाला सुरुवात केली. राग भीम, विलंबित एकताल, द्रुत ख्याल, त्रिताल, मिश्र भैरवी व मिश्र पहाडी, ठुमरीच्या बहारदार गायनाने अलंकापुरीतील रसिकांची ‘ती’ रात्र सूरमयी ठरली. साळुंके यांना अविनाश पाटील (तबला), सौरभ साळुंके, दमयंती शिंदे-माने (हार्मोनियम), पूजा साळुंके-देवकाते यांची मोलाची साथसंगत लाभली. या वेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक गायनाचार्य वेदानंद गावडे, ज्ञानराज गावडे, योगिराज लोहोर, बाळासाहेब गावडे आदींसह पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उल्हास रोकडे गुरुजी, तर आभार वेदानंद गावडे यांनी मानले.शास्रीय गायनाचा आस्वाद घेण्यासाठी अलंकापुरीसह चऱ्होली, साबळेवाडी, मोहितेवाडी, काळूस, चिंचोशी, इंदुरी, मोशी, वाघोली, बहुळ, वडगाव शिंदे, भावडी, पाचाणे, पुसाणे, वाजेवाडी, आपटी, तुळापूर, चोविसावाडी, डुडूळगाव, केंदूर, चिंबळी, भोसरी, वडमुखवाडी, लोहगाव, वडगाव घेनंद, भाऊ पिंपळगाव, शेलपिंपळगाव, ताजणेमळा, मरकळ, निरगुडी, सोळू, गोलेगाव, कोयाळी, दिघी अशा इतर गावांहून रसिकांनी उपस्थिती लावली होती.(वार्ताहर)आळंदीत शास्त्रीय संगीत गायनाच्या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद खरोखरच उल्लेखनीय आहे. आळंदीत धार्मिक शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी आलेल्या प्रत्येकाने संगीत क्षेत्रात पारंगत असणे गरजचे आहे. - पं. प्रकाशसिंहजी साळुंके, जगद्विख्यात सूरमणीख्याल, ठुमरी, राग भीम, विलंबित एकता, द्रुत ख्याल, त्रिता, मिश्र भैरवी अशा शास्त्रीय गायनाचा आस्वाद प्रथमच मिळाला असून, जगद्विख्यात सूरमणी पं. प्रकाशसिंहजी साळुंके यांच्या गायन खरोखरच मंत्रमुग्ध करून टाकणारे आहे. - रमेश गोडसे रसिक, मरकळ