नीरा परिसरात ५६ रुग्ण सक्रिय.
नीरा : राज्यासह पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत असल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले गेले. पुरंदरच्या ग्रामीण भागात मात्र आता कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. तालुक्यातील ४१ गावांत २४९ कोरोनाबाधित रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. नीरा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ५६ रुग्ण कोरोना सक्रिय आहेत. ही नीरा व परिसराला धोक्याची घंटा आहे.
पुरंदरच्या ग्रामीण भागातील सहा गावांमध्ये आजही १० पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत. ही १० गावे कोरोनाची हॉटस्पॉट गावे असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. तालुक्याचे शेवटचे टोक असलेले व सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नीरा गावात २६ रुग्ण कोरोना सक्रिय असून, शेजारीच असलेल्या पिंपरे (खुर्द) गावात २४ रुग्ण कोरोना सक्रिय आहेत. वीर गावात १५ रुग्ण सक्रिय, नाझरे (क.प.) १२, आंबळे आणि दिवे गावात १० रुग्ण सक्रिय आहेत.
पुरंदर तालुक्यात मागील आठवड्याभरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता आहे. मागील सोमवारी ७, मंगळवारी २६, बुधवारी २६, गुरवारी ९, शुक्रवारी २७, शनिवारी २५, रविवारी ३, सोमवारी ४९, तर आज मंगळवारी २३ व्यक्तींचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. सोमवारच्या अहवालानुसार नीरा प्रा.आ. केंद्र अंतर्गत ५६ रुग्ण सक्रिय, परिंचे प्रा.आ.केंद्र अंतर्गत ३९ रुग्ण सक्रिय, सासवड ग्रामीण रुग्णालय अंतर्गत ४७ रुग्ण सक्रिय, माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ४२ रुग्ण सक्रिय, बेलसर प्रा. आ. केंद्र ३० रुग्ण सक्रिय, जेजुरी ग्रामीण रुग्णालयांतर्गत १५ रुग्ण सक्रिय, तर वाल्हे प्रा. आ. केंद्र अंतर्गत १० रुग्ण सक्रिय असल्याची माहिती पुरंदरच्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला जाधव यांनी दिली.