दौंड तालुक्यातील मौजे देलवडी येथे शेतीदिन उत्साहात पार पडला.
कृषि विभागाच्या क्रॉपसॅप योजनेअंतर्गत कृषी सहायक संध्या आखाडे यांनी गृहलक्ष्मी महिला शेतकरी गट, दिशा महिला शेतकरी गट, मोरया महिला शेतकरी गट व परिसरातील इतर महिला शेतकऱ्यांची शेतीशाळेचे आयोजन केले होते. त्यामध्ये आतापर्यंत १० शेतीशाळा वर्ग घेण्यात आले आहेत. कार्यक्रमात पाटस येथील राष्ट्रपती पुरस्कार विजेते शेतकरी संदीप घोले यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर यांनी शेतकरी गट स्थापना, शेतकरी गटाचे फायदे, विकेल ते पिकेल योजना, संत सावतामाळी रयत बाजार अभियान योजनांबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी नरेंद्र काटे, उपसरपंच मंगल शेलार, मंडळ कृषि अधिकारी अप्पासाहेब खाडे, कृषी पर्यवेक्षक संजय फराटे, कृषी सहायक संध्या आखाडे, अंबादास झगडे, विशाल बारवकर, अभिजित लोणकर, तुकाराम रडे, सचिन लोणकर, अभिजित लोणकर, राजाभाऊ शेलार, दत्तात्रय शेलार, योगेश भोसले, हेमंत शेलार, उद्धव शेलार,संतोष कोंडे,संतोष लव्हटे, शहाजी शेलार,विठ्ठल टुले, रत्नदीप शेलार, रोहिदास टुले, देविदास शेलार, सतीश शितोळे, सुनील मेमाणे यांच्यासह गृहलक्ष्मी,दिशा व मोरया या महिला शेतकरी गटातील सदस्य व देलवडी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक संध्या आखाडे यांनी केले. व आभार नरेंद्र काटे यांनी मानले.
देलवडी तालुका दौंड येथे शेतकरी प्रशिक्षणाचे उपस्थित शेतकरी वर्ग