पुणे : पोटगी द्यावी लागू नये, म्हणून पत्नी एका कंपनीत काम करीत असल्याची बनावट कागदपत्रे तयार करुन कौटुंबिक न्यायालयात सादर केल्याप्रकरणी पोलिसांनी पती व सासर्यांविरुद्ध न्यायालयाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
अनंत रमेश पाबळे (वय ४०) आणि रमेश केशव पावळे (वय ७२, दोघे रा. टेल्को कॉलनी, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हडपसर येथील एका ३८ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे.
कौटुंबिक न्यायालयात त्यांचा पोटगीचा खटला सुरु आहे. या खटल्यात अनंत पाबळे यांनी ८ नोव्हेंबर २०१९ रोजी काही एस्तऐवज सादर केले. त्यात फिर्यादी यांना पोटगी मिळू नये, म्हणून त्या एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करीत आहेत, असा खोटा दस्तऐवज बनवून तो शिवाजीनगरमधील कौटुंबिक न्यायालयात सादर केला. तो खरा आहे, असे न्यायालयास सांगून त्यांनी फिर्यादी व न्यायालयाची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.