आज झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणूकीदरम्यान सरपंचपदासाठी अलका शेंडगे व उपसरपंचपदासाठी कविता बिडगर यांचेच प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्याने सरपंचपदी अलका शेंडगे व उपसरपंचपदी कविता बिडगर बिनविरोध निवडून आल्या असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद कुर्डे यांनी जाहीर केले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. सी. केदारी व माधव बिराजदार यांनी कामकाज पाहिले.
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात राजकीयदृष्ट्या महत्तवाच्या समजल्या जाणाऱ्या न्हावरे ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच कोण होणार याबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली होती. दरम्यानच्या काळात अनेक खलबतं झाली. काही सदस्य सहलीसाठीही बाहेर गेले होते अखेर नाट्यमय घडामोडी होऊन सरपंचपदासाठी शेंडगे व उपसरपंचपदासाठी बिडगर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सरपंच शेंडगे व , उपसरपंच बिडगर यांचा शिरूरचे पोलीस उपनिरीक्षक सुनील मोटे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.