शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

अलंकापुरी अडकली वाहनकोंडीच्या विळख्यात

By admin | Published: April 26, 2017 3:00 AM

कोट्यवधींचा विकासआराखडा मंजूर असूनही अपुऱ्या आणि अरुंद रस्त्यांमुळे अलंकापुरीतील वाहतूककोंडीची समस्या काही केल्या मार्गी लागत नसून

भानुदास पऱ्हाड / शेलपिंपळगावकोट्यवधींचा विकासआराखडा मंजूर असूनही अपुऱ्या आणि अरुंद रस्त्यांमुळे अलंकापुरीतील वाहतूककोंडीची समस्या काही केल्या मार्गी लागत नसून, दिवसेंदिवस शहरातील प्रमुख चौकांमध्ये तासन्तास वाहनांना ‘ब्रेक’ लावून ताटकळत उभे राहावे लागत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर चक्का जाम होत आहे. यामुळे समस्त अलंकापुरीसह चालक, वाहक, प्रवासी कंटाळले आहे. श्री संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविक रोज अलंकापुरीत येत असतात. याबरोबर चाकण औद्योगिक वसाहतीमधील सामानाची ने-आण मोठ्या प्रमाणात अलंकापुरीतूनच होत असते. यामुळे शहरातील रस्ते कायम गजबजलेले असतात. यामुळे सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहतूककोंडी होऊन वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागने नित्याचीच बाब झाली आहे. तासन्तास ही कोंडी सोडविणे वाहतूक कर्मचाऱ्यांनाही अशक्यप्राय होऊन जाते. यामुळे वाहने एकाच ठिकाणी खोळंबलेली असतात. सायंकाळच्या वेळी भररस्त्यात छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे होणारे अतिक्रमण या समस्येत अधिक भर घालत आहे. सध्या विवाह समारंभाचे अधिक मुहूर्त असल्याने आळंदी नित्याने गजबजलेली असते. शहरातील विविध ठिकाणची विवाह कार्यालये, धर्मशाळा, मंदिरे आदी ठिकाणी विवाह समारंभ पार पडत असल्याने बाहेरील गावावरून वऱ्हाडी लोकांची अनेक वाहने सातत्याने अलंकापुरीत येत असतात; मात्र अशा वाहनांना आळंदीतील वाहतूक कोंडीचा सामना करीत इच्छितस्थळी पोहोचावे लागत असल्याने अपघातजन्य परिस्थिती समोर उभी राहिली जात आहे.आळंदीला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे वडगाव, चाकण, मरकळ बाजूकडून शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांना अधिक अडचण निर्माण होत आहे. चाकण औद्योगिक वसाहतीकडून आळंदीमार्गे पुणे-नगर मार्गाकडे जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहनांच्या रांगा लागल्या जात आहेत.