पुणे : पुलांचे पुणे ही पुण्याची ओळख निर्माण करणारे ब्रिटीशकालीन पूल अजूनही भक्कम आहेत. त्यातील वेलस्ली पुलाला १८७ वर्षे तर संभाजी पुलाला १७७ वर्षे झाली आहेत. त्याशिवाय शंभर वर्ष झालेले आणखी ३ पूल शहरात आहेत. त्यांचीही अवस्था नव्याने झालेल्या पुलापेक्षाही अजून भक्कम आहे.महापालिकेने खासगी कंपनीकडून या पुलांच्या करून घेतलेल्या तपासणीतच हे निदर्शनास आले आहे. बंडगार्डनचा पूल १५० वर्षांपेक्षा जूना आहे. त्याची अवस्था मात्र अवजड वाहतूकीमुळे थोडी नाजूक झाल्याने तो बंद करण्यात आला आहे. जुना हॅरीस १२२ वर्षांचा तर छत्रपती शिवाजी ९४ वर्षांचा आहे.आहेत. होळकर पूलाचे दप्तर महापालिकेच्या जुन्या कागदपत्रात सापडत नाही.पुणे शहरात मुळा मुठेवर एकूण ३१ पूल आहेत. त्यातील ७ ब्रिटीशकालीन आहेत. सन २०१३ - १४ मध्ये महापालिकेने खासगी संस्थेकडून या सर्व पुलांचा भक्कमपणा शास्त्रीय आधारावर तपासून घेतला आहे. त्यांच्या अहवालात त्यांनी ३१ पैकी फक्त ७ पुलांच्या कामाबाबत शंका व्यक्त करून सुधारणा सुचवली होती.शहरातील पूल : श्री छत्रपती राजाराम, हुतात्मा रविंद्र म्हात्रे, एस. एम. जोशी, यशवंतराव चव्हाण, छत्रपती संभाजी, काकासाहेब गाडगीळ (झेड पूल), कै. बाबाराव भिडे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, जयवंतराव टिळक, छत्रपती शिवाजी, त्रिंबकजी डेंगळे , जुना संगम, नवीन संगम, वेलस्ली, महादजी शिंदे, राजीव गांधी, स्पायसर कॉलेज, वि. भा. पाटील, जुना हॅरीस, नवीन हॅरीस, होळकर जुना, संगमवाडी, बंडगार्डन (जुना), बंडगार्डन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतू, आगाखान, मुंढवा, मुंढवा (नवीन), वारजे हायवे.
ब्रिटीशकालीन सर्व पूल अजूनही भक्कम; वेलस्ली पुलाला १८७ वर्ष, संभाजी पूल १७७ वर्षांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 6:10 AM