नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसची मागणी
बारामती : कोरोना कोविड १९ व इतर रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना मोफत उपचार करावेत. नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे. याबाबत बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या सामाजिक संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी संबंधित अंगीकृत रुग्णालये व संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक लावण्याची मागणी केली. वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांनी बारामती व इंदापूर तालुक्यातील सद्यस्थिती सांगून कोरोना रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचे दाखवून दिले. एन.डी.एम.जे संघटनेचे विधी सल्लागार अॅड. अमोल सोनवणे यांनी सर्व कायदेशीर बाबी शासन निर्णय, अधिसूचना व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील बारकावे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या निदर्शनास आणले.
प्रांताधिकारी कांबळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे संघटनेच्या सूत्रांनी सांगितले.
या वेळी पुणे जिल्हा निरीक्षक धनाजी गायकवाड, इंदापूर तालुका अध्यक्ष वैभव धाईंजे,तालुका सचिव शिवाजी बनसोडे, अनिल बगाव,अतुल बनसोड,नवनाथ भागवत, प्रणव भागवत हे उपस्थित होते.
————————————————
फोटो ओळी : प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने निवेदन देताना कार्यकर्ते.
१६०७२०२१-बारामती-१४