याबाबत अधिक माहिती अशी की, राजुरी येथील हौसाबाई घंगाळे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय गावातील चावडी जवळ करतात. बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास दोन अज्ञात इसम दुचाकीवरून त्यांचे दुकान जवळ आले. त्यातील एकाने त्यांना शनिमंदिर कोठे आहे, असे विचारले त्यानंतर त्याने माझी आई आजारी असून मला पाच हजार रुपयांच्या वस्तू दान करायच्या आहेत. तसेच मला भाज्यांचे बाजारभाव विचारत एक कापडी पिशवी समोर ठेवली व यामधील वस्तू मला दान करायच्या असे सांगत बोलण्यात गुंतवत घंगाळे यांना त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण त्या पिशवीत ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर हातचालाखी करत हे गंठण लंपास केले. दरम्यान काही वेळाने घंगाळे यांनी ही पिशवी उघडली असता त्यात एक नारळ, दोन बिस्किट पुडे व तीन दगडाचे तुकडे निघाले. मात्र गंठण न मिळाल्याने आपली फसवणूक करून चोरट्यांनी ते लांबवले असल्याचे समजले. पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
भरदिवसा अज्ञातांनी महिलेस लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:11 AM