शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
3
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
5
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
6
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
7
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
8
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
9
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
10
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
11
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
12
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
14
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
15
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
16
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
17
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
19
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

देशात एकाच वेळी सर्व निवडणुका शक्य नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 1:59 AM

एक देश एक निवडणूक ही घोषणा दिसावयास आकर्षक वाटते, पण मुळात घटनात्मकदृष्ट्या ते शक्य नाही.

पुणे : एक देश एक निवडणूक ही घोषणा दिसावयास आकर्षक वाटते, पण मुळात घटनात्मकदृष्ट्या ते शक्य नाही. केंद्रस्थानी असलेला एखादा पक्ष अशा प्रकारे सर्व निवडणुका एका वेळी घेऊ शकेल, अर्थात त्या पक्षाची बहुतांश राज्यांत सरकारे असावी लागतील. पण हे प्रत्यक्षात येणे शक्य नसल्यामुळे एक देश एक निवडणूक या देशात शक्य नसल्याची स्पष्टोक्ती गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी केली.एमआयटीतर्फे आयोजित नवव्या भारतीय छात्र संसदेच्या चौथ्या सत्रातील ‘एक देश एक निवडणूक उत्तम शासन व्यवस्थेकडे पाऊल’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी उत्तर प्रदेश विधानसभेचे उपसभापती रघुनाथसिंह चौहान, राज्यसभेचे माजी सचिव विवेककुमार अग्निहोत्री, आमदार सरिता सिंह उपस्थित होते. या वेळी सरिता सिंह यांना आदर्श युवा विधायक या पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच राजस्थान येथील बासंती गमेटी, डॉ. शहनाज खान आणि बीड येथील ऋतुजा आनंदगावकर यांना उच्चशिक्षित आदर्श युवा सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.वाघेला म्हणाले, पंडित नेहरू यांच्या काळात सर्व निवडणुका एकाच वेळी होत असत, परंतु पुढे इंदिरा गांधी यांनी १९७१मध्ये लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेतल्या. पुढे १९७२ मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हापासून लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुकीच्या वेळापत्रकात जो विस्कळीतपणा आला, तो पुढे तसाच सुरू राहिला. गेल्या तीस वर्षांत पंतप्रधान किंवा त्या-त्या राज्याचे मुख्यमंत्री राजकीय गणितानुसार मुदतपूर्व निवडणुका घेत आहेत. यामुळे निवडणूक यंत्रणेपासून ते प्रचारापर्यंत होणारा खर्च खूपच वाढला आहे.पक्षांतर केल्यास निवडणूक लढविण्यावर १० वर्षे बंदी घालावीसध्याच्या राजकारणाला पक्षांतर आणि फोडाफोडीच्या राजकारणाचे ग्रहण लागले आहेत. हॉर्स ट्रेडिंग खूप होत आहेत. याचा पक्षाला आणि संबंधित राज्याला मोठा फटका बसतो. त्यामुळे जो कोणी पक्षांतर करेल, त्याला भविष्यातील १० वर्षे निवडणुकांना बंदी असावी, असेही वाघेला यांनी या वेळी सांगितले.>धर्माच्या नावावर महिलांचे अस्तित्व दडपून टाकू नकाआज धर्माच्या नावावर महिलांचे अस्तित्व कमी करण्याचे काम होत आहे. ही गोष्ट महिलांना मंजूर नाही. त्याकरिता सर्व तरुणींनी सामाजिक परंपरा आणि धर्म बाजूला ठेवून पुढे आले पाहिजे. गरीब महिलांवर दिवसागणिक शारीरिक व मानसिक अत्याचार होत आहेत याची नोंद होत नाही, यासाठी महिलांनी पुढे आले पाहिजे. लोकप्रिय व्यक्ती आणि तारे-तारकांनी तसेच राजकीय नेत्यांनी पुढाकार घेऊन या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा कारत यांनी केले. या वेळी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई, भारतीय महिला काँग्रेसच्या महासचिव नगमा मोरारजी उपस्थित होत्या.

जीएसटी व नोटाबंदीमुळे देशाचा फायदाजीएसटी आणि नोटाबंदीमुळे भारत देशाला याचा मोठा फायदा झाला आहे. यामुळे देशातील आर्थिक स्थितीत पारदर्शकता आली आहे असे प्रतिपादन एसबीआय बँकेच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी मांडले. या वेळी कृषी शास्त्रज्ञ देवेंद्र शर्मा, वरिष्ठ पत्रकार अ‍ॅड. भावना सोमय्या उपस्थित होते.