शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

पुणे शहरासह जिल्ह्यातील संचारबंदीच्या काळातील सर्व आपत्कालीन व्यवस्था सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 8:20 PM

मुख्यमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केली संचारबंदी लागू

ठळक मुद्देखासगी वाहतूक, पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई महापालिकेने शहरात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका केल्या आहेत तैनात

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शहरासह जिल्ह्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस दलासह अग्निशामक दल नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर आहेत. मुख्यमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली असून, खासगी वाहतूक, पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या काळात जर कोणाला वैयक्तिक स्वरूपाची किंवा वैद्यकीय अडचण निर्माण झाल्यास या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करण्याकरिता सर्व व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. शहरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी असून, रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. प्रशासनाने पोलीस, आरोग्य विभाग, आपत्ती निवारण व्यवस्थापन, रुग्णवाहिका, रुग्णालयांचे डॉक्टर्स, पॅरा मेडिकल कर्मचारी यांना जमावबंदी आणि संचारबंदीच्या आदेशामधून वगळलेले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत आगीच्या तीन ते चार घटना शहरात घडल्या आहेत. यासोबतच आजारी व्यक्ती किंवा नागरिकांना अचानक उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांच्यावेळी वैद्यकीय मदत उपलब्ध होऊ शकणार आहे. नागरिकांनी त्याची काळजी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांना आवश्यकता असल्यास किंवा कोणती अडचण निर्माण झाल्यास पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशामक दल, महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्याशी संपर्क साधता येणार आहे. यासोबतच आपापल्या भागात रुग्णवाहिकांची सेवा देणारी गणेश मंडळे, संस्था यांच्यासोबतही नागरिक संपर्क साधू शकतील.=====महापालिकेने शहरात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. पालिका, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासनाच्या सर्व वैद्यकीय सुविधा सुरू आहेत. यासोबतच सर्व दवाखाने आणि रुग्णालयेही सुरु राहणार आहेत. कोणाला वैद्यकीय अडचण असल्यास किंवा कोठून मदत उपलब्ध न झाल्यास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेची मदत नागरिक घेऊ शकतात.  - हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती=====आपत्कालीन परिस्थितीत येथे साधा संपर्क :- आगीच्या घटना                    १०१वैद्यकीय मदत                    १०८महापालिका आपत्कालीन सेवा            ०२०-२५५०६८००/१/२/३श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट        २४४७९२२२, २४४८१४७२

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय