शिरूर : मराठा, धनगर आरक्षणाप्रमाणे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात लटकला असून चारही पक्षांनी ओबीसींच्या आरक्षणाच्या प्रश्नाची वाट लावण्याचे काम करत आहेत. आरक्षणासाठी राष्ट्रीय जनगणना करणे हा एकमेव पर्याय असल्याने त्यासाठी आम्ही झगडणार, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केले.
शिरूर येथील साई मंगल कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा कार्यकारिणी आढावा आणि संवाद व समीक्षा बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपाध्यक्ष सविता मुंढे, गोविंद दळवी निरीक्षक बाबासाहेब कांबळे, जिल्हाध्यक्ष पूर्व विनोद भालेराव, पश्चिम कमलेश उकरंडे, महिलाध्यक्षा सिमा भालसेन, जिल्हा उपाध्यक्ष हिरामन वाघमारे, रंजित पाडोळे, महासचिव मंगलदास निकाळजे, संघटक साईनाथ लोंढे, जावेद शेख, सम्यक विद्यार्थी आंदोलन रोहित भोसले, आशितोष भालेराव, ऋषिकेश म्हस्के, जनार्दन मस्के, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाकूर म्हणाल्या की, ओबीसीच्या प्रश्नावर प्रचंड राजकारण चालू असून ओबीसींना आरक्षण न देण्याची प्रस्थापित पक्षांची नीती राहिलेली आहे. चुकीचा इम्पिरिकल डाटा असल्याने देता येत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टकडे केंद्र सरकारने दिले आहे. इम्पिरिकल डाटाची चुकीची दुरुस्ती करण्यासाठी समिती नेमण्यात आली त्या समितीची पाच वर्षांत एकही बैठक झाली नाही. त्यावरून त्यांना डाटा द्यायचा नाही हे दिसत असून ते ओबीसींची फसवणूक करत आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आरक्षणप्रश्नी दुसऱ्याकडे बोट दाखवत असून ते प्रामाणिक असते तर त्यांनी केंद्राकडून झगडून डाटा मिळविण्याचे व आरक्षण देण्याचे काम केले असते. त्याप्रमाणे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अध्यादेश काढून ओबीसींना आरक्षण देऊ असे सांगत असून, ही शुद्ध फसवणूक आहे कारण राज्याकडे इम्पीरिकल डाटा नाही. तो राष्ट्रीय जनगणनेमधून उपलब्ध होईल. तसेच
आगामी काळात नगरपालिका, महानगरपालिका व स्थानिक संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असून कुठल्याही निवडणुकीत कोणाशीही युती करणार नाही.
या वेळी पुणे जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे विनोद भालेराव उपस्थित मान्यवरांसह कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
240921\img-20210923-wa0049.jpg
शिरुर येथील वंचित बहुजन आघाडीच्या संवाद व स समिक्षा बैठकी त प्रभारी अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांचा सत्कार करण्यात आला .