शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पाणीप्रश्नावर सर्वपक्षीय आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 2:27 AM

उन्हाळ्याची सुरुवात झाली असतानाच उपनगरांमध्ये पिण्याच्या पाण्याची ओरड सुरू झाली आहे. उपनगरांमधील नागरिकांना प्रामुख्याने त्रास

पुणे : उन्हाळ्याची सुरुवात झाली असतानाच उपनगरांमध्ये पिण्याच्या पाण्याची ओरड सुरू झाली आहे. उपनगरांमधील नागरिकांना प्रामुख्याने त्रास होत असून तेथील सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्याविरोधात शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत आक्रमक धोरण स्वीकारत प्रशासनावर टीका केली. पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी त्यांना उत्तरे देत समाधान करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही.महापौर मुक्ता टिळक यांनी सभेचे कामकाज सुरू करताच पाण्याच्या प्रश्नावर सर्वच नगरसेवकांनी टीका सुरू केली. शहरात कुठे ८ तास, तर कुठे पाणीच येत नसल्याची ओरड सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. धानोरी, नगररोड, लोहगाव, हडपसर, कात्रज, कोथरूड भागात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.हडपसर परिसरात असमान पाणीपुरवठा होत आहे. आयुक्तांनी पाचवा पंप सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. यात सुधारणा झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा प्रमोद भानगिरे यांनी दिला. प्राची आल्हाट यांनी प्रशासन पाण्याच्या प्रश्नासंदर्भात गंभीर नसल्याची टीका केली.हांडेवाडी, महंमदवाडी परिसरात केवळ १० ते १५ मिनिटेच पाणी येत असल्याची तक्रारही या वेळी करण्यात आली. भाजपाच्या संजय घुले यांनी आपणही सध्याच्या विरोधकांनी केला त्याचप्रमाणे कारभार करतो आहोत, असे म्हणत सत्ताधाºयांना घरचा अहेर दिला.कोथरूड गावठाणात चढउतारामुळे पाणी येत नसल्याचे थातूरमातूर उत्तर अधिकारी देत असल्याचे नगरसेविका हर्षाली माथवड यांनी सांगितले. दरवर्षी पाण्यावर चर्चा होते.पाणी साठवण टाकीसाठी खासगी जागामालक जागा द्यायला तयार आहे. गेली अनेक वर्षे त्यासाठी प्रयत्न करतो आहे, मात्र प्रशासनाला हे काम करायचेच नाही, असे वसंत मोरे यांनी सांगितले.