पिंपरी : पिंपरी -चिंचवड शहरात भाजपा प्रदेश कार्यकारणीच्या दोन दिवसीय अधिवेशनाला शहरातील सर्व राजकीय पक्षांनी व संघटनांनी ‘आश्वासनांची आठवण’ आंदोलन करून विरोध दर्शविला. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची भाजपाला आठवण करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वपक्षीयांनी बुधवारी चिंचवड येथील महावीर चौैकात सकाळपासून लाक्षणिक उपोषण व आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, तसेच शहराध्यक्ष सचिन साठे, माजी महापौर व नगरसेविका मंगला कदम, डॉ. वैशाली घोडेकर, विनया तापकीर, पौर्णिमा सोनवणे, माजी नगरसेवक व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मारुती भापकर, राष्ट्रवादीचे सरचिटणीस फजल शेख, विजय लोखंडे, स्वराज अभियानाचे मानव कांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, भारिपचे देवेंद्र तायडे, एमआयएमचे शब्बीर शेख, आरपीआय (कवाडे) गटाचे रामदास ताटे, समाजवादी पक्षाचे रफीक कुरेशी, शेतकरी कामगार पक्षाचे हरेश मोरे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, संभाजी बिग्रेडचे अभिमन्यू पवार, नागरी हक्क सुरक्षा समितीचे प्रदीप पवार, ओबीसी संघर्ष समितीचे विशाल जाधव, माकपचे अमित कांबळे, गणेश दराडे, आनंदा यादव, तानाजी खाडे उपोषणाला बसले आहेत. भाजपाचे अधिवेशन संपेपर्यंत हे उपोषण करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. (वार्ताहर)
चिंचवडमध्ये सर्वपक्षीय आंदोलन
By admin | Published: April 27, 2017 5:05 AM