पुणे : लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी नगरसेवकांमध्ये लागलेली चढाओढ, यातून अधिकारी व नगरसेवक यांच्या निर्माण झालेले वाद आदी प्रकारांना आळा घालण्यासाठी, आता लसीकरण मोहिमेची सर्व जबाबदारी अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडे सुपूर्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़
पुणे शहरातील लोकसंख्या ४२ लाख गृहीत धरली, तरी यापैकी ६७ टक्के लोकसंख्या ही १८ वर्षे वयोगटावरील आहे़ या सर्वांना लसीकरण करणे हे महापालिकेसमोर आव्हान आहे़ त्यामुळे महापालिकेने या लसीकरणासाठी नियोजनबध्द कार्यक्रम निश्चित करावा अशा सूचना सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी केल्या होत्या़ त्यानुसार, आयुक्तांनी या संबंधीचे नियोजन करण्याचे सर्व अधिकार अतिरिक्त आयुक्त अग्रवाल यांना दिले आहेत़ यामध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यास मान्यता देणे, लस वाटप करणे व संबंधित प्रक्रियेचे सर्व अधिकार त्यांना देण्यात आले आहेत़
------------------------