(स्टार ९६३ डमी)
पुणे : पुणे जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण सर्वच विद्यार्थ्यांना यंदा अकरावीत प्रवेश मिळणार आहे. पुणे जिल्ह्यात ३०४ महाविद्यालये असून, त्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात १ लाख ७ हजार इतक्या जागा आहेत. सध्या सीईटीची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, वारंवार सीईटी संकेतस्थळ हँग होत असल्याने बंद करण्यात आले आहे. मात्र, लवकरच ते दुरुस्त करून प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. येत्या २१ ऑगस्टपर्यंत सीईटी घेण्याचे नियोजन असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात मागील वर्षी अकरावीसाठी १ लाख ७ हजार २१५ इतकी प्रवेश क्षमता होती. त्यात ७१ हजार ७२२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला होता. तर ३५ हजार ४९३ या जागा रिक्त झाल्या होत्या. यंदा मात्र प्रत्येकाला प्रवेश देण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
----
पॉईंटर्स
* दहावी पास विद्यार्थी :- १,२९,९६२
* अकरावीसाठी एकूण जागा पुणे आणि पिंपरीसाठी :- १ लाख ७ हजार
----
सीईटी वेबसाईट हँग
* वारंवार हँग झाल्याने सीईटी वेबसाईट सध्या बंद करण्यात आली आहे.
* दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच ती सुरू होईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
* येत्या २१ ऑगस्टपर्यंत सीईटी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
-----
सीईटीची तयारी कशी कराल ?
अकरावी प्रवेशासाठी सीईटी १०० गुणांची घेण्यात येणार आहे. त्यामध्ये गणित विषयाचे २५ प्रश्न, विज्ञान विषयाचे २५ प्रश्न, इंग्रजी विषयाचे २५ प्रश्न तर सामाजिक शास्त्र विषयाचे २५ प्रश्न (यात इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि नागरिक शास्त्र विषयांचा समावेश) असे एकूण १०० गुणांसाठी परीक्षा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या प्रमाणे तयारी करावी.
- अनिल जायभाय, शिक्षणतज्ज्ञ
----------------