शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

तीनही ठिकाणी उपनगराध्यक्ष बिनविरोध

By admin | Published: February 16, 2017 2:44 AM

जेजुरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे गणेश निकुडे यांची, तर स्वीकृत सदस्यपदी काँग्रेसचेच योगेश जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे

जेजुरी : जेजुरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे गणेश निकुडे यांची, तर स्वीकृत सदस्यपदी काँग्रेसचेच योगेश जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बारभाई यांची आज निवड झाली. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष व सदस्यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी अभिनंदन केले. जेजुरी नगरपालिकेत कॉँग्रेसची सत्ता असून, पालिकेतील बलाबल काँग्रेसचे १० आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ नगरसेवक आहेत. आज सकाळी १० ते दुपारी १२ या वेळात पालिकेतील उपनगराध्यक्षपद आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. पालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून ज्येष्ठ नगरसेवक गणेश निकुडे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. एकच अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. स्वीकृत नगरसेवकपदासाठी काँग्रेसकडून योगेश जगताप यांचे नाव गटनेते सचिन सोनवणे यांनी सुचविले, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गटनेते जयदीप बारभाई यांनी दिलीप बारभाई यांचे नाव सुचविले.पालिकेतील बलबल पाहता, दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांच्या संख्येनुसार दोहोंचाही प्रत्येकी एक उमेदवार निवडून येत होता. यामुळे योगेश जगताप आणि दिलीप बारभाई यांची ही निवड बिनविरोध झाली.या वेळी मुख्याधिकारी समीर भूमकर, नगरध्यक्षा वीणा सोनवणे, काँग्रेसचे गटनेते सचिन सोनवणे, राष्ट्रवादी काँंग्रेसचे गटनेते जयदीप बारभाई, काँग्रेसचे नगरसेवक महेश दरेकर, अजिंक्य देशमुख, बाळासाहेब सातभाई, गणेश शिंदे, पौर्णिमा राऊत, रुक्मिणी जगताप, शीतल बायस, वृषाली कुंभार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अरुण बारभाई, अमिना पानसरे, साधना लाखे, सुजाता झगडे, मंगल दोडके, सविता जगताप उपस्थित होत्या.निवडीनंतर झालेल्या सभेत नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष गणेश निकुडे व स्वीकृत सदस्य योगेश जगताप यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. या वेळी त्यांनी सांगितले, की आता निवडणुका पार पडल्या आहेत. आता लवकरच विविध विषय समीत्यांच्या निवडीही होतील. सर्वांनी एकविचाराने जेजुरीकरांना दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी काम करा. पाच वर्षांत जेजुरी शहर एक ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित झाली पाहिजे. यासाठी माझे तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य राहील.भगवान राऊत यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी माजी नगरसेवक भारत निकुडे, हेमंत सोनवणे, राजेंद्र दरेकर, हरिश्चंद्र जगताप, हरिदास रत्नपारखी, अलिम बागवान आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर भंडाऱ्याची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. (वार्ताहर)