या वेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार अजित पाटुल, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, डाॅ. सूर्यकांत कऱ्हाळे, कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट किरण कटारिया, उदय सराफ, शंकर भुजबळ, जगदीश गुजराथी, डॉ. अमित शेठ, डॉ. दत्तात्रय बामणे उपस्थित होते.
या मशीन भोर तालुक्यात दोन, हरजीवन रुग्णालयात १, गोरेगावकर रुग्णालयात एक, वेल्हे ग्रामीण रुग्णालय २, पौड ग्रामीण रुग्णालय २ व इतर खासगी दवाखान्यात देण्यात येणार आहेत. यामुळे कोविड सेंटर किवा खासगी दवाखान्यात काम करणाऱ्या डॉक्टरांना पुरेसा ऑक्सिजन मिळणार आहे.
रिअटर इंडिया कंपनी सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर
कोविड सेंटर किवा खासगी दवाखान्यात काम करणाऱ्या डॉक्टरांना अनेकदा थकवा येतो. ऑक्सिजन कमी होऊ शकतो. यासाठी रिअटर इंडिया कंपनीने पावर एअर प्युरिफायर दिले आहेत. रिअटर कंपनी अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत काम करत असून कोविड काळातही त्यानी चांगले काम सुरू केले आहे.