पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मतदानासाठी निवडणूक कार्यालयातून कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्यवाटप करण्यात आले. ईव्हीएम मशिन (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन) असे विविध साहित्य वाटप केले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात निवडणूक अधिकारी, कर्मचारी, बंदोबस्तासाठी पोलिसांची लगबग सुरू असल्याचे दिसून आले.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेची माहिती समजावून सांगितली आहे. बोगस मतदान कसे ओळखायचे, अंध-अपंग मतदार असतील, तर त्यांच्याच बोटावर शाई लावावी, त्यांच्यासोबत असलेल्यांच्या बोटावर शाई लावू नये, याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना माहिती दिली. बंदोबस्तासाठी तीन हजार पोलीस तैनात आहेत. नांदेड, लातूर, दौंड आदी भागातून पोलीस शहरात आले आहेत. निवडणूक कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप केले. सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत निवडणूक कर्मचारी साहित्य घेऊन आपापल्या निवडणूक केंद्रावर, बूथवर घेऊन जाताना जात आहेत. निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर सोडण्यासाठी पीएमपी बस उपलब्ध करुन दिल्या आहेत. (प्रतिनिधी)वोटरसर्च संकेतस्थळ, सारथीवरही माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेने व्होटर सर्च संकेतस्थळ चालू केले असून, मतदारांना तेथे केवळ मतदान ओळखपत्र क्रमांक किंवा स्वत:चे नाव टाकून मतदान केंद्राची माहिती मिळवता येणार आहे. आजपासून मतदारांसाठी पुणे महापालिकेप्रमाणे व्होटर सर्च संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर सारथीच्या ८८८८00६६६६ या टोलफ्री क्रमांकावर माहिती उपलब्ध आहे. पालिकेमध्ये मतदार हेल्पडेस्क निर्माण करण्यात आलेला असून, त्यासाठी इलेक्शन हेल्पलाइन कॉल सेंटरच्या ०२०-३९३३११९९ या तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेल्या क्रमांकावरही माहिती मिळेल.सोशल मीडियाचे प्रबोधनमतदान जनजागृतीकरिता स्थानिक केबलवर मतदान जनजागृती मार्गदर्शक चित्रफित प्रसारित केली जात आहे. आकाशवाणीद्वारे मतदार जागृती केली आहे. शहरातील सिनेमागृहांमध्ये जनजागृतीची मार्गदर्शक चित्रफित व मान्यवरांची आवाहनपर चित्रफित प्रसारित केली आहे. सोशल मीडिया - फेसबुकवर मार्गदर्शक चित्रफित व मान्यवरांची आवाहनपर चित्रफित प्रसारित केली आहे.पाच लाख नागरिकांना आवाहन मोबाइल एसएमएसद्वारे सुमारे पाच लाख नागरिकांना मतदानाचे आवाहन संदेश पाठविण्यात येणार आहेत. झोपडपट्ट्या, मॉल, सोसायट्या, भाजी मंडई, उद्याने, बसस्टॉप, कारखाने व इतर ठिकाणी मनपा हद्दीत सुमारे १३ लाख आवाहनपत्रकांचे वाटप केले असून, सुमारे तीन हजार फ्लेक्सद्वारे जनजागृती केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यींची मतदान जनजागृतीची पथनाट्य, व्यंगचित्र, स्किट,कोलाज,वक्तृत्व स्पर्धा झाली. प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये पालक मेळावे झाले. त्या वेळी शिक्षकांना व पालकांना मतदान जनजागृतीचे मार्गदर्शन व आवाहन केले. डॉक्टर व वकील यांच्या बैठका घेण्यात आल्या. मोबाईल व्हॅन,एल.ई.डी. स्क्रीनद्वारे जनजागृती केली.लोकप्रिय कलावंतांनीही केले आवाहन शहरात ३०० पथनाट्याद्वारे जनजागृती केली. ७१ झोपडपट्ट्या, ६ मॉल, १७० उद्याने सोसायट्या, भाजी मंडई, बसस्टॉप, कारखाने, हॉस्पिटल, गस्तीचे चौक, रेल्वे स्टेशन, ज्येष्ठ नागरिक संघ, सात पालक सभा, १५ महाविद्यालये, १२ मार्केट, तसेच इतर ठिकाणी मिळून चला हवा येऊ द्या या लोकप्रिय मराठी मालिकेतील कलावंतांचा समावेश असलेली चित्रफित सादर केली आहे. जनजागृतीपर ध्वनिफित तयार केली असून, ती व्हॉट्स अप, फेसबुकद्वारे प्रसारित केली आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम व्यक्तींच्या आवाहनपर मुलाखती झाल्या आहेत. शहरातील औद्योगिक १७ कंपन्यांमध्ये व ४ आयटी पार्क कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेऊन मतदान जनजागृती केली.मतदानादिवशी प्रवासासाठी सूट सोसायट्या, लग्न समारंभात मार्गदर्शनपर जनजागृती केली. शहरात २० ठिकाणी स्काय बलूनद्वारे जनजागृती, मतदार जनजागृतीपर सायकल रॅली, महाविद्यालयीन विद्यार्थी रॅली, तसेच पीएमपीच्या ५०० बसवर, ५०० आॅटोरिक्षा, १ लाख ३० हजार सिलिंडर, बँका, रुग्णालये, दवाखाने या ठिकाणी जनजागृतीचे स्टिकर लावण्यात आले. शहरातील सर्व एटीएम सेंटरवर मतदान जनजागृती स्टिकर डकविण्याचे काम सुरू आहे. मतदान केलेल्या मतदारांना उबेर या खासगी वाहन संस्थेद्वारे पाच किलोमीटर अंतरापर्यंत प्रवासासाठी रक्कम रुपये ५० ची सवलत देण्यात येणार आहे. गावाकडे येण्यासाठी आग्रहमहापालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक होत असून, यासाठी बाहेरगावी असलेल्या मतदारांना मतदानासाठी बोलावणे येत आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत अनेक कंपन्या असून, या ठिकाणी हजारो कामगार कार्यरत आहे. काही कामगारांची येथील मतदारयादीत नावे आहेत. तर अनेकांच्या नावांची नोंद गावाकडील मतदारयादीत आहे. त्यामुळे गावाकडे मतदान करण्यासाठी येथील मतदारांना गावाकडून बोलाविणे आल्याचे दिसून येत आहे. यासाठी संबंधित मतदाराची येण्याजाण्याची सोय करण्याची तयारी संबंधितांनी दर्शविलेली आहे. यासाठी काही उमेदवारांनी वैयक्तिकरीत्या वाहनदेखील पाठविले आहे. कामगार मतदारांची संख्या जादाशहरातील ४५ टक्के मतदार हे कामगार आहेत. मात्र, दूर अंतरावर मूळ गाव असल्याने अनेकजण मतदानासाठी मूळगावी जाण्यास तयार नसतात. एक दिवसात जाऊन येणे शक्य होत नाही. दरम्यान, एक मतदेखील महत्त्वाचे असून, त्यासाठी उमेदवार प्रयत्न करताना दिसून येत आहेत. तसेच शहरातील काही खासगी कंपन्यांकडून मतदानादिवशी सुटी न देता केवळ दोन तासांचा अवधी देण्यात आला आहे.
मतदान साहित्याचे केले वाटप
By admin | Published: February 21, 2017 2:48 AM