मागील अनेक महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसाय बंद आहेत. यामुळे अनेक व्यावसायिकांना आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे शहरात सर्व व्यवसायांना व्यवसाय करण्यास परवानगी दिल्याने आम्हाला ही परवानगी मिळावी, अशी मागणी छोटे व्यावसायिक करू लागले आहेत. आंबेगाव तालुक्यात एकूण १०४ गावे आहेत त्यापैकी ८० ग्रामपंचायतीमध्ये बाधित रुग्ण आढळले आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी तालुक्यात एकूण २२ व्हेंटिलेटर २९३ ऑक्सिजन बेड व ८८५ ऑक्सिजन विरहित बेड उपलब्ध आहेत. खासगी व शासकीय मिळून बाराशे बेड उपलब्ध आहेत. सध्या तालुक्यात ५३१ रुग्णांवर उपचार चालू असून रुग्णांची संख्या कमी होत आहे. दोन आठवड्यापूर्वी तालुक्यात दररोज एकशे पन्नास ते शंभर पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. आता मात्र मागील आठवड्यापासून दहा ते तीस या दरम्यान रुग्ण आढळत आहे.
सात ते दुपारी दोनपर्यंत व्यवसायाची मुभा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:09 AM