पुण्यात सरसकट कोरोना लसीकरणाला परवानगी द्या; अजित पवार करणार केंद्राकडे पाठपुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 02:46 PM2021-03-12T14:46:49+5:302021-03-12T14:47:36+5:30

कोरोना रुग्णांची वाढती संख्येमुळे सरसकट लसीकरण सुरू करण्याची मागणी होत आहे.

Allow full vaccination of corona in Pune; Ajit Pawar will follow up with the Central government | पुण्यात सरसकट कोरोना लसीकरणाला परवानगी द्या; अजित पवार करणार केंद्राकडे पाठपुरावा

पुण्यात सरसकट कोरोना लसीकरणाला परवानगी द्या; अजित पवार करणार केंद्राकडे पाठपुरावा

Next

पुणे: पुण्यात सरसकट लसीकरणाला परवानगी द्यावी यासाठी आपण केंद्राकडे मागणी करणार असल्याचे पुणे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ज्या ठिकाणी जास्त केसेस आहेत त्या सर्वच ठिकाणी लसीकरणासाठी हेच धोरण अवलंबावे अशी मागणी आपण खासदारांतर्फे करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहे. 

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शहरात सरसकट लसीकरणाला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता ही मागणी करण्यात येत आहे. याबाबतच आज बैठकीत चर्चा करण्यात आली. अजित पवार यांनी याबाबत केंद्राकडुन आणखी लसी मागवाव्यात यासाठी पाठपुरावा करण्यात यावा अशी भुमिका यावेळी मांडली. 

पवार म्हणाले “ बैठकीत चर्चा झाली आहे त्याप्रमाणे परिक्षा घेतली जावी अशी मागणी आपण करणार आहोत. सध्या पार्लमेंट सुरु आहे तर त्याबाबत पाठपुरावा करण्याची विनंती आम्ही केली आहे. फक्त पुणेच नाही तर इतर ठिकाणी देखील जिथे रुग्ण संख्या जास्त आहे तिथे हे धोरण स्विकारावे अशी आमची भुमिका आहे असे पवार म्हणाले”. 

Web Title: Allow full vaccination of corona in Pune; Ajit Pawar will follow up with the Central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.