पुणे : मागील ११ महिन्यांत तब्बल ४ महिने सर्व बाजारपेठा बंदच असल्याने सरकारने आता कोरोना हाताळणीत निर्बंधांबरोबरच अर्थव्यवस्थेचाही विचार करायला हवा, असे मत माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री व सरकारमधील अन्य नेत्यांना गाडगीळ यांनी पत्र पाठवले आहे. त्यात काही उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यात प्रामुख्याने कोरोनाचे प्रमाण कमी होत चालले आहे. तिथे बाजारपेठांमधील दुकाने वेगवेगळ्या दिवशी किमान अर्धा दिवस उघडण्याची परवानगी द्यावी, शहराचे विभाग करून तिथेही सार्वजनिक, तसेच खासगी कार्यालयेही सुरू करावीत, अशा उपायांचा समावेश आहे.
निर्बंध असेच वाढवत नेले तर अर्थव्यवस्था कोसळून पडेल व ती पूर्वपदावर येण्यासाठी किमान २ वर्षे लागतील. त्यात सामान्य नागरिक भरडून निघेल, अशी भीती गाडगीळ यांनी व्यक्त केली आहे.