पुणे : शहरातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठवीमध्ये शिकणाऱ्या एका चौदा वर्षीय कबड्डीपटू मुलीचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला. या घटनेनं संपूर्ण पुणे हादरले आहे. या प्रकरणात ऋषिकेश उर्फ शुभम बाजीराव भागवत या मुख्य आरोपीसह ३ अल्पवयीन मुलांना देखील बिबवेवाडी पालीसानी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी तिची चुलत बहीण श्रुतिका व्यवहारे हिने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी झालेल्या शाळेत शिकणाऱ्या क्षितिजा अनंत व्यवहारे हीचा तिच्या जवळच्याच असणाऱ्या नातेवाईकां पैकी असणाऱ्या ऋषिकेश उर्फ शुभम बाजीराव भागवत याने तिच्यावर असणाऱ्या एकतर्फी प्रेमातून तिच्यावर तीन अल्पवयीन साथीदारांसह कोयत्याने वार करत निर्दयीपणे खून केला. काही वर्षांपूर्वीच एकतर्फी प्रेमाची कबुली देत हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर त्यांच्यामधील असलेल्या नात्याचे स्व रूप सांगितल्यानंतर शुभम ने स्वतःची चूक सर्वांसमोर कबूल करत पुन्हा असे होणार नसल्याची कबुली दिली होती. त्यानंतर तो दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला होता.
या सर्व गोष्टींचा मनात राग धरून शुभम याने क्षितिजा वर आपल्या अल्पवयीन साथीदारासह पाळत ठेवून मंगळवारी संध्याकाळी तिचा खून केला. बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे,पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर हे नम्रता पाटील पोलिस उपयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, राजेंद्र गलांडे सहायक पोलिस आयुक्त वानवडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत.
क्षितिजा अनंत व्यवहारे (वय 14) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. ती कबड्डीपटू होती. काल सायंकाळी ती मित्र मैत्रिणी सोबत कबड्डीचा सराव करत होती. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या शुभमने तिला बाजूला घेऊन तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि सोबत आणलेल्या कोयत्याने शुभमने क्षितिजाच्या गळ्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या क्षितीजाचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपीने अत्यंत क्रूरपणे हा गुन्हा केलाय. त्यानंतर त्याने घटनास्थळीच कोयता आणि सोबत आणले शस्त्र टाकून देऊन पळ काढला होता.