पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी अटक विधान परिषद सदस्य अनिल भोसले यांच्यासह चौघांची विशेष न्यायालयाने ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. विशेष न्यायाधीश ए. एस. गोसावी यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला आहे.याप्रकरणी योगेश लकडे (वय ३९, रा. आंबेगाव-नºहे) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आमदार अनिल शिवजीराव भोसले (वय ५५, रा. बाणेर रस्ता), सूर्याजी पांडुरंग जाधव (वय ६९, रा. कमला नेहरू पार्क), तानाजी दत्तू पडवळ (वय ५०, रा. तापकीरनगर, काळेवाडी), शैलेश संपतराव भोसले (वय ४७, रा. नीलज्योती सोसायटी, गोखलेनगर) अशी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अतिरिक्त सरकारी वकील विलास पठारे यांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. भोसले हे बँकेचे अध्यक्ष, संचालक असताना, जाधव संचालक होते. तसेच पडवळ हे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शैलेश भोसले हे बँकेचे मुख्य हिशेब तपासनीस होते.फिर्यादींच्या कंपनीची भोसले बँकेच्या लेखापरीक्षणासाठी नेमणूक केली होती. तसेच, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने या कंपनीला बँकेच्या रोख शिल्लक रकमेबाबत पडताळणी करण्यास सांगितले होते. या वेळी बँकेकडे ७१ कोटी ७८ लाख ८७ हजार रुपये रोख असल्याचे कागदोपत्री दाखविले. तसेच ही रक्कम बँकेच्या मुख्य शाखेकडे पाठविण्यात आलेल्याचे दाखविले; मात्र मुख्य कार्यालयात रोख रक्कम ठेवण्याची सोय नसताना कागदोपत्री मुख्य कार्यालयात पाठविल्याचे दाखविले. सर्वांनी आपल्या पदाचा गैरवापर करून सुमारे ७१ कोटी ७८ लाख ८७ हजार रुपयांचा अपहार असून ही रक्कम त्यांनी स्वत:च्या फायद्याकरिता वापरली असल्याचे त्यांनी या वेळी न्यायालयात सांगितले. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या अपहार प्रकरणात आता कलमवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम हे कलम वाढविण्यात आले आहे. १,१८७ ठेवीदारांच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या असून एकूण रक्कम ५२ कोटी ९२ लाख ९१ हजार १८६ रुपये आहे. बँकेत झालेल्या गैरकारभाराविषयी त्यांच्याकडे चौकशी करायची आहे, आरोपींची बँक खाती, स्थावर आणि जंगम मालमत्तेविषयी माहिती घ्यायची आहे, आरोपींनी या रकमेचा वापर कशाकरिता केला, याची माहिती घ्यायची आहे. गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे आरोपींकडून हस्तगत करायची आहेत, या बँकेतील गुंतवणूकदार, ठेवीदारांना त्यांची रक्कम परत दिली गेली आदी तपास करायचा असल्याने पठारे यांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. तर, आरोपींच्या वतीने एस. के. जैन, हर्षद निंबाळकर, बिपीन पाटोळे, ऋषिकेश गाणू आणि यशपाल पुरोहित यांनी बाजू मांडली.
शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण ;आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना सहा मार्चपर्यंत कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 8:55 PM
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी अटक विधान परिषद सदस्य अनिल भोसले यांच्यासह चौघांची विशेष न्यायालयाने ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. विशेष न्यायाधीश ए. एस. गोसावी यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
ठळक मुद्दे71 कोटी 78 लाख 87 हजारांचा अपहारशिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण