आळंदी : तीर्थक्षेत्र अलंकापुरीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत प्रदक्षिणामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरून एकेरी मार्गाने वाहतूक करण्याचे आदेश कार्तिकी यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिले होते. परंतु शहरातून एकेरी मार्गाने वाहतूक होत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी दुहेरी मार्गाने वाहतूक होत असल्याने वाहतूककोंडी होत आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या आदेशाचे काटेकोर पालन होत नसल्याचे खुद्द आळंदी नगरपालिका प्रशासनाचे म्हणणे असून तसे लेखी निवेदनही त्यांनी आळंदी व दिघी पोलिसांना देऊन एकेरी वाहतुकीची मागणी केली आहे.त्यासंदर्भात गुरुवारी (दि.३०) आळंदी नगरपरिषदेच्या कार्यालयात आळंदी पोलिस, दिघी पोलीस, पीएमपीएल प्रशासन व नगरपरिषदेच्या पदाधिकाºयांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या प्रसंगी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपाध्यक्ष सागर भोसले, मुख्याधिकारी समीर भूमकर, नगरसेवक प्रशांत कुºहाडे, पांडुरंग वहिले, सचिन गिलबिले, तुषार घुंडरे, दिनेश घुले, बालाजी कांबळे आदींसह आळंदी, दिघी पोलीस व पीएमपीएल प्रशासनाचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाºयांनी जारी केलेल्या आदेशामुळे पीएमपीएलच्या बसला स्थानकात येण्यासाठी संपूर्ण शहरातून फेरी मारावी लागत आहे. मात्र एकेरी मार्गाने वाहतूक करण्याचा आदेश इतर वाहतूकदार पाळत नसल्याने प्रदक्षिणा मार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन दिवसेंदिवस शहरात प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. परिणामी तास - दीडतास पीएमपीएलची बस या कोंडीत अडकत आहेत.बसमध्ये एकही प्रवासी नसतो. यामुळे बसच्या दिवसातील फेºयावर परिणाम होऊ लागला आहे. यावर उपाय म्हणून आळंदी पालिकेने फक्त पीएमपीएल बस वायजंक्शन मार्गाने स्थानकात आणण्याची मागणी केली. परंतु या मागणीमुळे जिल्हाधिकाºयांच्या आदेशाची पायमल्ली होणार असल्याने पीएमपीएलच्या पदाधिकाºयांनी नगरपालिकेच्या या मागणीला नकार दर्शविला. पूर्वीच्या वायजंक्शन मार्गाने स्थानकात बस आणण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी परवानगी द्यावी; त्यानंतर त्यामार्गावरून बस शहरात आणल्या जातील असे पीएमपीएलच्या पदाधिकाºयांनी स्पष्ट केले. यापार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात आळंदी नगरपरिषदेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी सौरभ राव यांची भेट घेऊन तसा प्रस्ताव सादर करणार असल्याचे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले.शहरातील जड वाहतूक नियंत्रित करण्यासाठी सुमारे १० ते १२ कर्मचाºयांची गरज आहे. मात्र आळंदी पोलीस ठाण्याकडे मुबलक मनुष्यबळ उपलब्ध नाही. तरीही दररोज आमचे १० कर्मचारी वाहतूक नियोजनासाठी कार्यरत आहेत. सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्याने संबंधित कारखान्यांना पत्रव्यवहार करून वाहने शहरात न आणण्याचे कळविले आहे. वाहतूकदार व स्थानिक नागरिकांनी एकेरी वाहतुकीचा नियम पाळला पाहिजे. आमचे काटेकोर नियोजन सुरू आहे.- नंदकुमार गायकवाड,सहायक पोलीस निरीक्षक, आळंदीआळंदी शहरातून होत असलेल्या जड वाहतूकीमुळे गेल्या चार - पाच दिवसात दोन ते तीन अपघात घडून आले आहेत. तर एकेरी वाहतुक होत नसल्याने या वाहनांमुळे तासनतास कोंडीची समस्या निर्माण होत आहे.शहरातून जड वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडी अधिक प्रमाणात होत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने शहरातील रस्त्यांवरून जड वाहतुकीवर निर्बंध घालावा. तसेच ही वाहने शहरात प्रवेश करण्यापूर्वी पयार्यी मार्गाने वळवावी अशा स्पष्ट सूचना नगरपरिषदेने बैठकीत पोलिसांना दिल्या आहेत.
आळंदीत एकेरी वाहतुकीचा बोजवारा, नगरपरिषदेने दिले पोलिसांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 2:33 AM