शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Pune Municipal Election: आघाडी, भाजपबरोबर आता मनसे, आपही ताकदीनिशी लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 3:00 PM

पुणे : लांबणीवर पडली असे वाटत असलेली महापालिका निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आता परत तोंडावर येण्याची शक्यता निर्माण झाली ...

पुणे : लांबणीवर पडली असे वाटत असलेली महापालिका निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आता परत तोंडावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्याबरोबरच याआधी फारशी चर्चेत नसलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना भोंगा, महाआरतीच्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या रिंगणात आली आहे. पंजाबसारखे राज्य ताब्यात आल्यामुळे आम आदमी पार्टीही (आप) आता शहरात संघटन करण्याच्या तयारीला लागली आहे.

सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू केल्या आहेत. संघटन वाढवण्याकडे लक्ष दिले जात आहे. स्थानिक प्रश्नांवरून आंदोलने केली जात आहेत. निवडणूक लांबणीवर पडण्याच्या शक्यतेने बहुतेकांनी प्रभागातील फ्लेक्स, बॅनर उतरवले होते. ते आता पुन्हा झळकू लागले आहेत.

महापालिका सध्या महापालिकेच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत १४ मार्चला संपली. नगरसेवकांचे सर्व अधिकार त्यामुळे संपुष्टात आले. त्यानंतर महापालिकेचे कामकाज आयुक्तांच्या, म्हणजे प्रशासकाच्या अखत्यारित आले. आता महापालिकेचे सर्व निर्णय आयुक्त स्तरावरच घेतले जातात. महापालिका निवडणूक झाल्यानंतर नव्या महापालिकेत भोवतालच्या २३ गावांचा समावेश केला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेचे क्षेत्रफळ आता मुंबई महापालिकेपेक्षाही मोठे झाले आहे. या गावांच्या समावेशामुळे आता महापालिकेचे एकूण ५८ प्रभाग असतील. एकूण ५७ प्रभागांमध्ये प्रत्येकी ३ व एका प्रभागात २ नगरसेवक असतील, नगरसेवकांची एकूण संख्या १७३ असेल. एकूण मतदार संख्या ३३ लाख ३४ हजार आहे.

काँग्रेस

महाविकास आघाडी की स्वतंत्र हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. आम्ही स्वतंत्रपणे लढता येईल, अशाच तयारीत आहोत. महापालिकेतील ५ वर्षांच्या भारतीय जनता पार्टीच्या सत्तेने पुणेकर नागरिकांचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. त्याचा उपयोग आम्हाला नक्की होणार आहे. - रमेश बागवे, शहराध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस

न्यायालयाकडून अशा निर्णयाची अपेक्षा नव्हती. ओबीसी आरक्षणासह निवडणूक व्हावी, अशीच राष्ट्रवादीची भूमिका आहे. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. निवडणुकीची तयारी आम्ही पूर्ण करीत आणलीच होती, त्यामुळे स्पर्धेत आम्ही पुढेच आहोत. - प्रशांत जगताप, शहराध्यक्ष

शिवसेना

प्रभाग रचना किंवा तयारीला वेळ नाही, अशी कारणे शिवसेना कधीच देत नाही. त्यामुळे निवडणूक कधीही झाली तरी आमची तयारी आहे. शिवसैनिक कशालाही तयार आहेत. - संजय मोरे, शहरप्रमुख

भारतीय जनता पार्टी

महाविकास आघाडीला मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण अशा प्रत्येक गोष्टीवर अपयश आले आहे, याचे कारण त्यांना हे कधी करायचेच नव्हते. न्यायालयात त्यांना योग्य बाजूच मांडता आली नाही. निवडणुकीत हाच आमचा प्रमुख मुद्दा असेल.- जगदीश मुळीक, शहराध्यक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

काहीही टीका झाली तरी आमचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे हीच खरी ताकद आहे. निवडणूक कधीही होऊ द्या, आम्ही ती पूर्ण ताकदीनिशी लढणार, हे नक्की आहे. अंतिम निर्णय अर्थातच राज ठाकरे घेतील.- हेमंत संभूस, प्रदेश सरचिटणीस

आम आदमी पार्टी

आम्ही मतदार संपर्क अभियान सुरू केले आहे. नागरिकांच्या कोपरा सभा घेऊन आपची भूमिका नागरिकांमध्ये सांगत आहोत. महापालिकेची निवडणूक आम्ही पूर्ण शक्तीने लढणार आहोत.- मुकुंद कीर्दत, शहर प्रवक्ता

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाElectionनिवडणूकMNSमनसेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाAAPआप