लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीत मतदारांनी प्रस्तापितांना धक्का देत तरुणांना संधी दिली. या तरुणांबरोबरच अनुभवी अशा जेष्ठ नागरिकांनाही मतदारांनी कल दिला असून गावाच्या विकासाची जबाबचारी नवतरुन आणि जेष्ठांच्या खांद्यावर दिली आहे. जेष्ठांचा अनुभव आणि तरुणांचा काम करण्याचा जोश या दोन्हीच्या समन्वयाने गावाचा विकास साधला जाणार आहे. ५ हजार ३३ उमेदवारांपैकी ६०० पेक्षा जास्त जेष्ठ उमेदवार या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडूण आले आहेत.
जिल्ह्यात ७४६ ग्रामपंचयातीच्या निवडणुकांचा रणसंग्राम नुकताच पार पडला. या निवडणुकीत जवळपास २ हजार ५९१ प्रभागासाठी निवडणुक होणार होती. मात्र, यातील ८१ ग्रामपंचयाती या बिनविरोध झाल्याने. ६४९ गावातील २ हजार १० प्रभाग तर एकुण ५ हजार ३३ जागांसाठी निवडणुक लागली होती. या जागांसाठी जवळपास ११ हजार ७ उमेदवार रिंगणात होते. स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षणामुळे महिला उमेदवारांची संख्या लक्षणिय होती. त्या खालोखाल तरुण आणि जेष्ठ उमेदवारांचीही संख्या जास्त होती. जवळपास महिना भर निवडणुकीचा फड रंगला होता.
१८ तारखेला झालेल्या मतजोणीत अनेक धक्कादायक निकाल लागले. प्रस्तापितांना नाकारात तरुणांना मतदारांनी स्विकारले. यात अनेक दिग्जजांना परभाव स्विकारावा लागल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरली. या निवडणुकीत महिला आणि तरुणांपाठोपाठ जेष्ठ उमेदवारांनाही मतदारांनी संधी दिली. ६० टक्याहून अधिक महिला उमेदवार निवडणुक आल्या आणि त्या खालोखाल जेष्ठांनाही संधी दिली. यामुळे नवदरुणांचा कामे करण्याचा उत्साह आणि जेष्ठ नागरिकांचा कामाचा अनुभव याची सांगड घातल गावात विकासाचे वारे वाहतील असा विश्वास अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केला. निवडुण आलेल्या जेष्ठ सदस्यानींही नव नवीय योजनांच्या माध्यमातून गावांचा विकास करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. या निवडणुकीत ५ हजार ३३ उमेदवारांपैकी जवळपास ६०० च्या आसपास जेष्ठ नागरिक निवडुण आले आहेत.